Vikram Kumar Tendernama
पुणे

पुणे महापालिकेत 'प्रशासक राज' सुसाट; ५०० कामांचे टेंडर मार्गी

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महापालिकेवर (Pune Municipal Corporation) ‘प्रशासक राज’ आल्यानंतर गेल्या तीन महिन्यांत ६४७ कामांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी सुमारे ८० टक्के म्हणजेच ५०० कामांचे टेंडर मार्गी लागले आहेत. या अंतर्गत सुमारे ३५० ते ४०० कोटी रुपयांची देखभाल, दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

महापालिकेत गेल्या १५ मार्चपासून आयुक्त विक्रम कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी केली जात आहेत. त्यानुसार पुढील वर्षभर केल्या जाणाऱ्या देखभाल, दुरुस्तीच्या कामाच्या टेंडरला मंजुरी दिली जात आहे. गेल्या १ एप्रिलपासून ६४७ विकासकामांना वित्तीय समितीने मंजुरी दिली आहे. त्यापैकी ४०० टेंडर या अंतिम टप्प्यात आहेत. तर उर्वरित १०० टेंडरची प्रक्रिया सुरू आहे.

डिसेंबरमध्ये प्रकल्पांचे टेंडर?

आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘सध्या देखभाल दुरुस्तीच्या टेंडरला मान्यता दिली जात आहे. नव्या प्रकल्पासाठी ‘डीपीआर’चे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे हे प्रकल्प मंजुरीसाठी येत्या नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंतचा कालावधी लागू शकतो. लगेच नवे प्रकल्प येऊ शकणार नाहीत.