Vikram Kumar, PMC Tendernama
पुणे

Pune : आचारसंहितेची धास्ती! फेब्रुवारी संपण्यापूर्वी कामाचे टेंडर काढण्याचे...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महापालिकेचा २०२४-२५चा अर्थसंकल्प तयार केला जाईल, त्याचा आढावा सुरु झाला आहेत. तसेच चालू अर्थसंकल्पातील कामाचे टेंडर प्रक्रिया पूर्ण करून त्याची वर्कऑॅर्डर २५ फेब्रुवारीपूर्वी काढा असे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे महापालिकेची महत्त्वाची कामे त्यापूर्वी मार्गी लागावीत यासाठी आयुक्तांनी कामाचा आढावा घेतला आहे. २०२३-२४च्या अर्थसंकल्पातील देखभाल दुरुस्तीसह प्रकल्पाच्या कामासाठी तरतूद आहे. त्यांच्या सर्व मान्यता व टेंडर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्‍यक आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर महापालिकेतील नवी कामे ठप्प होणार आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून २०ते २५ फेब्रुवारी पूर्वी कामाच्या वर्क ऑर्डर काढावेत असे आदेश दिले आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.

पावसाळ्यापूर्वी एप्रिल मे महिन्यात शहरातील पावसाळी गटारे, नाले साफ करण्याची कामे केली जातात, पण दरवेळी टेंडर काढण्यास उशीर झाल्याने ही कामे जून महिन्यात देखील सुरु असतात. यंदा पावसाळ्यापूर्वीचा काळ लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये जाणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या कामाला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नाले सफाई, पावसाळी गटारांची स्वच्छता याची टेंडर प्रक्रिया लवकर सुरु करा. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पुढील वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर या कामांची वर्कऑर्डर काढली जाणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.