Contractor Tendernama
पुणे

Pune: राज्यातील साडेचार हजार ठेकेदार जाणार संपावर; काय आहे प्रकरण?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पंतप्रधान ग्रामसडक योजना (PM Gram Sadak Yojana) आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत (CM Garm Sadak Yojana) झालेल्या रस्त्यांच्या कामांची बिले दोन वर्षांपासून दिलेले नाहीत. त्यामुळे राज्यातील साडेचार हजारांहून अधिक ठेकेदारांनी (Contractors) संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र राज्य हॉटमिक्स कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनची राज्यस्तरीय बैठक झाली. या वेळी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब गुंजाटे, जयराम पुकरेजा यांच्यासह राज्यातील इतर ठेकेदार, पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य सरकारकडून चालू आर्थिक वर्षात ४० हजार कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत. त्यापैकी २५ हजार कोटींच्या कामांच्या टेंडर जवळपास प्रक्रिया पूर्ण आहे. परंतु, मागील देयके थकल्याने ठेकेदार, कंत्राटदारांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

राज्य सरकारने गेल्या आर्थिक वर्षातील केवळ एक हजार ७६ कोटी रुपये देऊ केले आहेत. त्यातही १८ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कपात करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक कामे बंद होण्याच्या मार्गावर असून ठेकेदारांवर अवलंबून असलेल्या कामगारांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकीत बिले तातडीने द्यावीत, अशी मागणी गुंजाटे यांनी केली.