पुणे (Pune) : दुबई, सिंगापूरनंतर आता पुण्यातून बँकॉकसाठी विमानसेवा सुरू होत आहे. २२ नोव्हेंबरपासून आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा असेल.
पुण्याहून दर बुधवारी, शुक्रवारी व रविवारी असे तीन दिवस ही विमानसेवा असेल. तर बँकॉकहून सोमवारी, गुरुवारी व शनिवारी असे तीन दिवस सेवा असणार आहे. पुण्याहून बँकॉकसाठी थेट विमानसेवा सुरू होत असल्याने पर्यटकांना देखील याचा मोठा फायदा मिळणार आहे.
पुणे विमानतळाचा विंटर शेड्यूल येत्या काही दिवसांतच सुरू होत आहे. यात देशांतर्गत विमानसेवेची संख्या तर वाढणारच आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या देखील वाढणार आहे.
पुण्याहून बँकॉकसाठी विमान रात्री ११ वाजून १० मिनिटांनी झेपावेल. पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी बँकॉकला पोचेल. तर बँकॉकहून मध्यरात्री १ वाजून १५ मिनिटांनी झेपावेल. पुण्याला पहाटे ४ वाजून १५ मिनिटांनी पोचेल.