Pimpri Chinchwad Tendernama
पुणे

PCMC : 'या' प्रकल्पासाठी महापालिकेने काढले 120 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : देशाच्या राज्यघटनेचा प्रचार, प्रसार आणि जनजागृतीसाठी महापालिका (PCMC) शहरात संविधान भवन उभारणार आहे. त्यासाठी सुमारे १२० कोटी रुपयांचे टेंडर (Tender) प्रसिद्ध केले आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून चिखली प्राधिकरण पेठ क्रमांक ११ मध्ये संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमआरडीएकडून संबंधित जागा महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्याचे ई-टेंडर दोन कोटी ५३ लाख २५ हजार ४०७ आणि दुसऱ्या टप्प्यातील सुमारे ११७ कोटी अशी एकूण ११९ कोटी ७१ लाख ३५ हजार ३२६ रुपयांची टेंडर प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

याबाबत आमदार लांडगे म्हणाले, ‘‘नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संविधान भवन उभारणीसाठी पाठपुरावा सुरू केला. प्राधिकरणाकडून महापालिकेकडे जागा हस्तांतरित झाली आहे. आता संविधान भवन उभारणीसाठी टेंडर प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरीत होवून शहरात संविधान तथा राज्य घटनेचा प्रचार, प्रसार व्हावा. यासह जगभरातील लोकशाही देशाच्या घटनांचा अभ्यास करता यावा, असा संकल्प आहे. संविधान जागृती आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी उभारण्याच्या कामाला गती द्यावी, अशी सूचना महापालिका प्रशासनाला केली आहे, असे यांनी सांगितले.