Vande Bharat Train Tendernama
पुणे

Vande Bharat: मुंबई-पुणे-सोलापूर 'वंदे भारत'चा मुहूर्त ठरला

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुंबई-सोलापूर-मुंबई (Mumbai - Solapur - Mumbai) दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे (Vande Bharat Express) १० फेब्रुवारीला उद्‍घाटन होणार आहे. तर तीन फेब्रुवारीला या रेल्वेची चाचणी होणार आहे.

ही चाचणी प्रामुख्याने पुणे-मुंबई दरम्यान असणाऱ्या घाट क्षेत्रात होणार आहे. यावेळी घाटात ५५ किलोमीटर वेगाने रेल्वे धावेल. यावेळी घाटात गाडीला काही अडचणी येतील का, हे पहिले जाणार आहे.

जो वेग अन्य रेल्वे गाड्यांना घाटात निर्धारित करून दिला आहे. तोच वेग वंदे भारत एक्स्प्रेसला लागू असणार आहे. त्यामुळे ही चाचणी केवळ औपचारिकता असणार आहे.

चेन्नई येथील ‘आयसीएफ’ या रेल्वे डबा बनविणाऱ्या कारखान्यांतून वंदे भारत एक्स्प्रेसचा रेक एक फेब्रुवारीला मुंबईसाठी निघेल. तो दोन फेब्रुवारीला मुंबईला पोचणार आहे. तर तीन फेब्रुवारीला घाटात वंदे भारतची चाचणी होणार आहे.