Canark Bridge Tendernama
पुणे

19, 20 नोव्हेंबरला मुंबईतील बहुतांश रेल्वे गाड्या रद्द; कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुंबई ते पुणे या रेल्वेमार्गावरून प्रवास करण्याचा तुमचा विचार असले तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुंबई रेल्वे विभागात १९ व २० नोव्हेंबरला २७ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईला येणाऱ्या व मुंबईहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांना या कालावधीत ब्रेक लागणार आहे. सीएसएमटी-मस्जिद सेक्शनमध्ये असलेल्या कर्नाक पूल (Canark Bridge) पाडण्याच्या कामासाठी हा ब्लॉक रेल्वेने घेतला आहे. (Railways Mega Block on 19, 20 Nov. in Mumbai Division)

या काळात पुण्याहून सुटणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात डेक्कन, इंटरसिटी एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेससारख्या महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. दोन दिवस पुणे-मुंबई दरम्यान रेल्वे रद्द केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. सीएसएमटी-मस्जिद सेक्शनमध्ये असलेला कर्नाक पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी २७ तासांचा ब्लॉक घेतला आहे. या दरम्यान इंद्रायणी एक्स्प्रेस दादरहून सुटेल.

१९ नोव्हेंबरला रद्द केलेल्या गाड्या

पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस, हैदराबाद-मुंबई हुसैन सागर एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस वाया निजामाबाद, कोल्हापुर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई राज्यरानी एक्स्प्रेस, जबलपूर-मुंबई गरीबरथ.

२० नोव्हेंबरला रद्द केलेल्या गाड्या

मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-जबलपूर गरीबरथ, मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड स्पेशल, मुंबई-पुणे प्रगति एक्स्प्रेस, मुंबई-आदिलाबाद एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन क्वीन, मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड़ राज्यरानी एक्स्प्रेस, मुंबई-अमरावती एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापुर महालक्ष्मी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई प्रगति एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई स्पेशल, जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस वाया निजामाबाद, मुंबई-हैदराबाद हुसैन सागर एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस.

२१ नोव्हेंबरला रद्द केलेल्या गाड्या

मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस