पुणे (Pune) : पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा MHADA) वतीने जाहीर केलेल्या सोडतीसाठी आत्तापर्यंत सुमारे तीस हजार अर्ज दाखल झाले आहेत.
काही अर्जदारांनी आम्ही दिवाळी व विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी केली होती, म्हणून अर्ज करण्यास आणखी एक महिन्यांची मुदतवाढ देत असल्याचे म्हाडाच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता १० डिसेंबर असणार आहे. तर मार्चमध्ये झालेल्या सोडतीमध्ये रिक्त राहिलेल्या २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सुमारे १२६ सदनिकांचा समावेशही करण्यात आल्याचे म्हाडाकडून सांगितले आहे. या सोडतीमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सदनिकांचा समावेश आहे.
अशी आहे सोडत...
एकूण सदनिका - ६ हजार २९४
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य - २ हजार ३४०
म्हाडाच्या विविध योजनेतील - ९३
पीएमवाय योजनेतील - ४१८
२० टक्के योजनेतील - ३ हजार ३१२
१५ टक्के योजनेतील - १३१
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत - १० डिसेंबर
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत - १० डिसेंबर
ऑनलाइन पैसे भरण्याची अंतिम मुदत - १२ डिसेंबर