Maharashtra Police Tendernama
पुणे

Good News! 7 हजार जागांसाठी पोलिस भरती; जाणून घ्या तारीख...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Valase Patil) यांनी खूशखबर दिली आहे. गृहमंत्र्यांनी नव्या पोलिस भरतीबाबत (Police Bharti) नुकताच मोठा खुलासा केला आहे. राज्याच्या पोलिस दलात (Maharashtra Police) नव्याने भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. त्यासाठी तारीखही निश्चित करण्यात आली आहे. पोलिस दलात किती जागांवर पोलिस भरती केली जाणार असून, या प्रक्रियेला कधी सुरवात होईल, याचीही सविस्तर माहिती गृहमंत्री वळसे यांनी जाहीर केली आहे. (Maharashtra Police Bharti Latest News)

राज्यात येत्या 15 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, विविध पदांच्या रिक्त असलेल्या सुमारे 7 हजार जागा भरण्यात येणार असल्याचे गृहमंत्री वळसे यांनी जाहीर केले आहे. अहमदनगर येथील पोलिस दलाच्या एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना वळसे यांनी ही माहिती दिली. राज्य पोलिस दलातील नव्या भरतीची प्रक्रिया मागील काही वर्षांपासून रखडली होती. त्यामुळे नवी भरती कधी होणार याची उत्सूकता युवकांना होती. पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवकांची राज्यात मोठी संख्या आहे. ग्रामीण भागातील युवकांसाठी ही चांगली संधी असते. त्यामुळे पोलिस दलात भरती होणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील मुलांची संख्याही अधिक असते.

15 जूनपासून राज्यातील पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू होईल. त्यामध्ये विविध पदांसाठी सात हजार जागा भरण्यात येणार आहेत. गृहविभागाने आतापर्यंत साडेपाच हजार जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशी माहिती वळसे यांनी दिली. पोलिस दलातील रिक्त जागांची संख्या आणि मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन भविष्यात आणखी पदे भरण्यात येणार आहेत.