Pune Tendernama
पुणे

Pune : जलवाहिनीच्या कामामुळे जलसंपदा विभागाने केल्या सूचना

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महापालिकेने २५ वर्षांपूर्वी खडकवासला ते पर्वती जलकेंद्र अशी १२ किलोमीटर लांबीची बंद जलवाहिनी टाकली आहे. या जलवाहिनीला गंज चढला असून, तिची काही ठिकाणी दुरुस्ती करावी लागणार आहे. या कामाचे तीन टप्प्यांचे टेंडर काढण्यात आले होते. हे काम सुरू केल्यानंतर महापालिकेला कालव्यातून प्रतिदिन तीन हजार एमएलडीइतके पाणी उचलावे लागणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्ती, रंगरंगोटीचे काम ऑक्टोबरनंतर करावे, अशा सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केल्या आहेत.

जलसंपदा विभाग आणि महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. यात पाणीकपातीचा निर्णय न घेता तो कालवा सल्लागार समितीवर सोपवला होता. मोसमी पाऊस विलंबाने सक्रिय झाल्यास उपलब्ध पाणीसाठा शहर आणि ग्रामीण भागाला पुरू शकणार नाही. ग्रामीण भागाला दुसरे उन्हाळी आवर्तन देण्यासाठी जलसंपदा विभागाला सुमारे पाच टीएमसी पाण्याची गरज आहे, तर शहराला पाणी पुरवठ्यासाठी सात टीएमसी पाण्याची मागणी महापालिकेने गेल्या आठवड्यातील बैठकीत केली आहे.

धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत

धरण-टीएमसी-टक्के

-टेमघर-०.२८-७.६३

-वरसगाव-६.८७-५३.५९

-पानशेत-३.५३-३३.१५

-खडकवासला-१.०७-५४.३९

-एकूण-११.७६-४०.३३