Ajni Railway Station Tendernama
पुणे

Pune : रेल्वेकडून समर गिफ्ट! पुण्यातून सुटणार 'या' दोन गाड्या

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : उन्हाळ्यातील वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे (Central Railway) प्रशासनाने पाच विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला. यातील दोन रेल्वे पुण्याहून सुटणार आहेत. यामध्ये पुणे-सावंतवाडी रोड व पुणे-अजनी एक्स्प्रेसचा समावेश आहे.

पुणे-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस (२० फेऱ्या) ः
पुणे-सावंतवाडी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०१२११) ही दोन एप्रिल ते चार जूनदरम्यान धावणार आहे. दर रविवारी पुण्याहून रात्री नऊ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून ३० मिनिटांनी सावंतवाडी रोडला पोचेल. सावंतवाडी रोड ते पुणे (गाडी क्रमांक ०१२१२) ही रेल्वे दर बुधवारी सावंतवाडी रोड येथून सकाळी १० वाजून १० मिनिटांनी सुटेल. पुण्याला रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी पोचेल.


थांबा कुठे? ः

लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सावरदा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग व कुडाळ आदी स्थानके.

पुणे ते अजनी एक्स्प्रेस (२२ फेऱ्या)
पुणे-अजनी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०११८९) ही पाच एप्रिल ते १४ जूनदरम्यान दर बुधवारी पुणे स्थानकावरून दुपारी तीन वाजून १५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून ५० मिनिटांनी अजनी स्थानकावर पोचेल. तसेच दर गुरुवारी अजनी स्थानकावरून (गाडी क्रमांक ०११९०) रात्री सात वाजून ५० मिनिटांनी निघेल. पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी पोचेल.

थांबा कुठे? ः

दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा आदी स्थानके