Railway Station Tendernama
पुणे

पुणे रेल्वेस्थानकातून प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! उद्यापासून..

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : नाताळात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासन मध्य रेल्वेवर विशेष रेल्वे सोडणार आहे. यात विशेष रेल्वेच्या ४२ फेऱ्या होणार आहेत. तर पुणे स्थानकावरून नागपूर व अजनीसाठी २० फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे पुणे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.

पुणे - अजनी साप्ताहिक विशेषांक (१० फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१४४३ ही रेल्वे ६ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान पुणे स्थानकावरून दर मंगळवारी दुपारी तीन वाजून १५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी अजनीला पोहचेल. तर गाडी क्रमांक ०१४४४ ही ७ डिसेंबर ते ४ जानेवारीदरम्यान दर बुधवारी अजनी स्थानकावरून रात्री ७ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी पुण्याला पोचेल. दौंड कॉर्ड लाइन, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा आदी स्थानकांवर थांबा देण्यात आला.

पुणे - नागपूर साप्ताहिक विशेष (१० फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१४५१ ७ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान दर बुधवारी नागपूर येथून दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. पुण्याला सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४५२ ८ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान दर गुरुवारी पुण्याहून रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. नागपूरला दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता पोहोचेल. या रेल्वेला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा आदी स्थानकावर थांबा देण्यात आला.