E-ST Bus Tendenama
पुणे

'लालपरी'चा नवा अध्याय सुरू; पुण्यातून राज्यभर धावणार एसटीची ई-बस

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : राज्य परिवहन महामंडळात (MSRTC) आता ई-एसटीचा नवा अध्याय सुरू होत आहे. बंगळूरहून बुधवारी (ता. २५) पुण्यात दोन ई-एसटी दाखल झाल्या आहेत. पुणे -नगर मार्गावर ई-एसटीच्या सेवाचा प्रारंभ एक जूनपासून सुरू होणार आहे. यासाठीचे चार्जिंग स्टेशन देखील तयार झाले आहे.

पुण्याच्या विभाग नियंत्रक कार्यालयात चार्जिंग स्टेशन बांधले आहे. या शिवाय आता पुणे स्टेशनच्या बस स्थानकावर देखील चार्जिंग स्टेशन बांधले जात आहे. यामुळे पुणे स्टेशन बस स्थानकातून मुंबईला जाणाऱ्या ई एसटीला सेव्हन लव्ह चौकात जावे लागणार नाही. ई एसटीसाठी पुणे हे राज्याचे मुळ ठिकाण आहे. त्यामुळे पुण्याहून राज्यांच्या विविध भागात १५० ई बस धावणार आहे.

कशी आहे ई-एसटी :
१. ग्रीनसेल मोबॅलिटीची ही बस
२. ग्रे-रंग, त्यावर काळ्या रंगाचे स्टिकर्स
३. १२ मीटर लांबी तर ४ मीटर रुंदी
४. सुमारे दोन कोटी इतकी किंमत
५. ४५ आसनांसह संपूर्ण वातानुकूलित
६. विशेष म्हणजे री जनरेट ब्रेकिंग सिस्टीम
७. बस चार्ज होण्यासाठी लागतात सुमारे दीड तास
८. बस चार्ज केल्यावर २७० ते ३०० किमी धावते
९. उतारावर ब्रेक लावल्यास ३० टक्के बॅटरी होणार चार्ज

लवकरच कोल्हापूर व मुंबईमार्गावर धावणार
पुणे-नगरमार्गावर ई-एसटी धावल्यानंतर सुमारे दीड महिन्यांत पुणे-कोल्हापूर व पुणे-मुंबई ई-एसटी धावेल. त्या दृष्टीने प्रयत्न देखील सुरू आहेत. राज्य परिवहन महामंडळाचा विद्युत विभागासाठी मोठे परीश्रम घेत आहे. अवघ्या एक ते दीड महिन्यांत चार किमी लांबीची केबल टाकून पुण्याचे चार्जिंग स्टेशन कार्यान्वित केले आहे.