Collector Of Pune Tendernama
पुणे

Pune : कंत्राटदार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : राज्य कंत्राटदार महासंघ व पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले.

सरकारने आर्थिक तरतूद पूर्ण केल्याशिवाय टेंडर काढू नयेत अशी मागणी करण्यात आली. हे आंदोलन राज्य कंत्राटदार महासंघाचे सुरेश कडू व पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

या आहेत मागण्या :

- राज्यातील विविध विभागांत झालेल्या विकास कामांच्या देयकांची ४० हजार कोटी रुपयांची थकीत रक्कम तातडीने मिळावी

- राज्य सरकारने कोणत्याही विभागाचे विकास काम खर्चाची आर्थिक तरतूद करूनच मंजूर करावे

- विकास कामे करताना संबंधित कंत्राटदारास संरक्षण देण्याचा कायदा करावा

- शासनाने सर्व विभागांच्या छोट्या कामांचे एकत्रीकरण करून एकच मोठी निविदा काढणे तातडीने बंद करावे

- सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास या खात्यांमधील कामांचे वाटप अभियंत्यांना नियमांनुसार करावे