Pune Tendernama
पुणे

Ajit Pawar : अजित पवारांचा काय आहे पुणे जिल्ह्याच्या विकासाचा प्लॅन?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे हा वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील रस्ते, मेट्रो, रेल्वे मार्गाद्वारे विकासाला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. खोपोली ते खंडाळा मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी विविध विकासकामे सुरू केली आहेत. जिल्ह्यातील विकासाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मितीचा संकल्प असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलिस कवायत मैदानात आयोजित समारंभात ते बोलत होते. या वेळी पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक अंकित गोयल आदी उपस्थित होते. या वेळी झालेल्या संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर दर्शन दुगड यांनी केले.

याप्रसंगी महाळुंगे पोलिस ठाण्याचे राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालेले वरिष्ठ निरीक्षक वसंतराव बाबर, तसेच येरवडा मध्यवर्ती कारागृहातील सुभेदार सतीश बापूराव गुंगे, नामदेव संभाजी भोसले, हवालदार नवनाथ सोपान भोसले यांचा गौरव करण्यात आला. तसेच हुतात्मा नायक बालाजी डुबुकवाड यांच्या पत्नी अर्चना डुबुकवाड यांचा ताम्रपट प्रदान करण्यात आला.

अजित पवार म्हणाले...

- जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्मारकांच्या विकासासाठी मोठा निधी

- राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेद्वारे शेतकरी कुटुंबांना १२ हजार रुपये वार्षिक लाभ

- शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजनेवर भर

- जिल्हा वार्षिक योजनेचा ९४८ कोटी रुपयांचा आराखडा सादर, अतिरिक्त ४०० कोटींची मागणी