Solapur Municipal Corporation Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur : सोलापूर महापालिकेतील सर्वच ठेकेदारांवर कारवाई करा! कोणी केली मागणी?

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी मंत्रालयात निवेदन देवून सोलापूर महापालिकेच्या ठेकेदार म्हणून काम करणाऱ्या सर्व कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महापालिका आयुक्त यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सोलापूर महापालिकेमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणाऱ्या सर्वच कंपन्या कामगारांना किमान वेतन कायदा लागू असताना त्या कायद्याच्या नियमाप्रमाणे पगार देत नाहीत. कायद्यामध्ये कामगारांना पीएफसह इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असून, या अतिरिक्त सेवा कंपनीमार्फत पुरवल्या जात नाहीत, असा आरोप साठे यांनी निवेदनात केला आहे.