Accident Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur : कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे पुणे - सोलापूर महामार्ग धोकादायक बनलाय का?

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : सोलापूर - पुणे महामार्ग (Solapur Pune Highway) हा महामार्ग अत्यंत खराब झाला आहे. मोहोळ ते टेंभुर्णी दरम्यान खड्ड्यांची संख्या अधिक आहे.

मोहोळजवळ पूल अर्धवट स्थितीत असताना वाहतुकीला खुला केला आहे. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करत प्रवास करावा लागतो. महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचते. रस्त्याचा अंदाज येत नाही. वाहने वेगात असतात. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे रस्त्यावर दुचाकीधारकांची कसरत होते.

अडचणींचा सामना

- रात्रीचा प्रवास धोकादायक

- महामार्गालगत लागणारी छोटी गावे, ढाबे, हॉटेल आदी अनेक ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी महामार्गाचे दुभाजक फोडले

- दुभाजक फोडलेल्या ठिकाणांहून नागरिकांची जीव धोक्यात घालून ये-जा. महामार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्ष

- 'बीओटी’ तत्त्वावर साकारलेल्या या महामार्गाचे २०३१ पर्यंत देखभाल दुरुस्तीचे काम पुणे - सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनीकडे. पण त्याकडे दुर्लक्ष

रस्त्याचा प्रवास

१०१ किमी - एकूण हद्द

२० वर्षे - प्रकल्प कालावधी

महामार्गाच्या विकास आराखड्याला मंजुरी - २००९

काम सुरू करण्याचा संबंधित कंपनीला आदेश - २०११

८५ किमीचे काम पूर्ण - २०१३

महामार्गाचे उर्वरित काम पूर्ण झाले - २०१६