कोल्हापूर (Kolhapur) : कोल्हापूर जिल्हा परिषद (Kolhapur Zilha Parishad) मधील सर्व विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व कामाच्या टेंडर (Tender) प्रक्रियेमधील टेंडर संचाची किंमत ही इतर सरकारी विभागापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे टेंडर संचाची आकारणी ही सरकारी निर्णयानुसार करावी, अशी मागणी जिल्हा परिषद कंत्राटदार संघटनेने केली आहे. याबाबत सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
जिल्हा परिषदेकडून बयाना रक्कम आकारताना सरकारी निर्णयाचा विचार करून बयाना रक्कम आकारावी व ती बयाना रक्कम रोख, डी.डी. याऐवजी मुदतबंद ठेव पावती (PDR) च्या स्वरूपात आकारावी अशी मागणी करण्यात आली. तसेच पाईपलाईन खोदाईच्या सरासरी बाबत अंदाजपत्रकामध्ये केलेल्या तरतूदीच्या दराचा सरासरी दर करून टेंडर प्रक्रियामध्ये समाविष्ट करावा. त्यामुळे गावामध्ये होणाऱ्या तक्रारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
स्थळ पाहणी दाखला
जिल्हातील स्थानिक मक्तेदार यांना काम मिळणेकरिता, तसेच परजिल्हातील मक्तेदार यांनी निविदा भरल्यामुळे कामात तक्रारी वाढत असल्याचे दिसत आहे. तसेच कामास विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे टेंडर प्रक्रियेमध्ये स्थळ पाहणी दाखल्याची अट घालावी, अशी मागणी करण्यात आली.
टेंडरनामाच्या फेसबुक पेजला लाईक करा - https://www.facebook.com/tendernama
टेंडरनामाच्या ट्विटर पेजला फॉलो करा - https://twitter.com/tendernama
टेंडरनामाच्या इन्टाग्राम पेजला फॉलो करा - https://www.instagram.com/tendernama