New Katraj Tunnel Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्याहून पुण्याकडे येणाऱ्यांसाठी मोठी बातमी; 15 तारखेपर्यंत...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी कात्रज घाटातून (Katraj Ghat) सुरू असलेली एकेरी वाहतूक पुढील पंधरा दिवस म्हणजेच १५ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या कालावधीत शिंदेवाडीहून पुण्याकडे जाण्यासाठी कात्रज नवीन बोगद्याचा (Katraj New Tunnel) वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) करण्यात आले आहे.

जुन्या कात्रज घाट रस्त्यावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे शिंदेवाडीहून (ता. भोर) कात्रज घाट रस्त्यामार्गे पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असून, ही वाहतूक कात्रज नवीन बोगद्यामार्गे वळविण्यात आली आहे. तर जुन्या कात्रज घाटातून फक्त पुण्याहून साताऱ्याकडे जाणारी एकेरी वाहतूक सुरू आहे.

वाहतुकीतील हा बदल ३ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र, आता या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अजून पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे कात्रज जुन्या घाटातून सुरू असलेली ही एकेरी वाहतूक पुढील पंधरा दिवस म्हणजेच १५ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात दिली.

जुन्या कात्रज घाट रस्त्यावर रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी अजून पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे जुन्या घाट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे सुरू असलेली एकेरी वाहतूक १५ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. या कालावधीत प्रवाशांनी शिंदेवाडीहून पुण्याकडे जाण्यासाठी कात्रज नवीन बोगद्याचा वापर करून सहकार्य करावे.
- अजय भोसले, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण)