Construction Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यात तलाठी कार्यालयांसाठी २६ कोटींचे टेंडर

कार्यकारी अभियंतांच्या कार्यालयात हे टेंडर खुले होणार

टेंडरनामा ब्युरो

कोल्हापूर (Kolhapur) : जिल्ह्यातील नवीन 11 तलाठी कार्यालयांचे (Talathi Office) बांधकाम केले जाणार आहे. यासाठी 26 कोटी 75 लाख 3 हजार 870 रुपयांचा खर्च केला जाणार आहे. एका वर्षामध्ये हे काम पूर्ण करायची मुदत असून बुधवारी (ता. 17) सायंकाळपर्यंत ई-टेंडर (E-Tender) भरावी लागणार आहे.

तसेच, कागदपत्रांचा मुळ दस्ताऐवज गुरुवार (ता. 18) पर्यंत सकाळी पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प, अधीक्षक अभियंता यांच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात प्रत्यक्ष द्यावे लागणार आहे. याच दिवशी सकाळी 11 ला सकाळी 10 ला कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात हे टेंडर खुले केले जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात वेळवट्टी तलाठी कार्यालयासाठी 13 लाख 75 हजार 108 रुपये. कोळींद्रे तलाठी कार्यालयासाठी 13 लाख 75 हजार 298 रुपये. सरोळीसाठी 13 लाख 68 हजार 658 रुपये. उत्तर साठी 13 लाख 75 हजार 670 रुपये. आजरा कार्यालयासाठी 13 लाख 75 हजार 766 रुपये. खेडे साठी 13 लाख 75 हजार 559 रुपये. किणे गावासाठी 13 लाख 76 हजार 254 रुपये. चंदगड तालुक्यातील हेरे तलाठी कार्यालयासाठी 13 लाख 16 हजार 777 रुपये. कोवाड साठी 13 लाख 17 हजार 943 रुपये. चंदगड साठी 13 लाख 17 हजार 943 रुपये व निट्टूर साठी 13 लाख 17 हजार 943 रुपये अंदाजी खर्च दिला आहे. यासाठी इसारा रक्कम 14 हजार रुपये व 600 रुपये टेंडर शुल्क आहे. चंदगड तालुक्यातील सर्व गावांना इसारा रकमेमध्ये सवलत दिली आहे.

* ई-टेंडर या संकेतस्थळावर भरावे :
* http;//mahapwd.com.
* http;//mahatenders.gov.in