सोलापूर (Solapur) : जुना पुना नाका ते पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन अशा दोन उड्डाणपूल उभारणीसाठी २०१६ मध्ये मंजुरी मिळाली. २०१७ मध्ये ७०० कोटींचा डीपीआर तयार केला. मात्र या प्रकल्पाला सात वर्षे मुहूर्त लागला नाही. नुकतेच १ हजार १०० कोटींचे टेंडर काढले. प्रकल्प मुदतीत न झाल्याने प्रकल्पाची रक्कम ४०० कोटींनी आणि जागेचे मूल्यांकनही वाढल्याने भूसंपादनाच्या रक्कमेत २८ कोटींची वाढ झाली. असे एकंदरीत ४२८ कोटींनी प्रकल्पाचे बजेट वाढले आहे.
शहरातील भविष्यातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र शासनाने २०१६ मध्ये दोन उड्डाणपूल मंजूर केले. २०१७ मध्ये ७०० कोटींचा विकास आराखडा तयार केला. दरम्यान पाच वर्षांनंतरही भूसंपादन झाले नाही. जुना पूना नाका ते पत्रकार भवन (फेज वन) या मार्गावरील बाधित मिळकतींची अधिसूचना २८ फेब्रुवारी २०२१ मध्ये निघाली. बाधित मिळतींचे नुकसानभरपाई निश्चित करणे, मूल्यांकन, निवाडा जाहीर करणे, जागा ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत तब्बल दोन वर्षांचा कालावधी लोटला. आजमितीला फेज वन उड्डाणपूलाचे भूसंपादनाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर दोन खासगी मिळकतींचा विषय विभागीय आयुक्तांकडे प्रस्तावित आहे. जुना बोरामणी नाका ते मार्केट यार्ड (फेज दोन) या मार्गाची नव्याने मोजणी करण्यात आली आहे. त्यानुसार आता नव्याने बाधित मिळकतींसाठी शुद्धिपत्रक काढण्यात येणार आहे. त्यानंतर भूसंपादनाचे काम सुरू होईल. दरम्यान जुन्या डीपीआरनुसार प्रकल्पाची रक्कम ही १ हजार ४०० कोटींच्या घरात गेली. नव्या डीपीआरमध्ये सायकल ट्रॅकसह अनेक गोष्टींना कात्री लावून हे प्रकल्प बजेटमध्ये बसविण्यासाठी आणि निधीची जुळवाजुळव करून नवा डीपीआर तयार करण्यात सहा महिन्यांचा कालावधी गेला. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपूलासाठीची १ हजार १०० कोटींची निविदा जाहीर केली आहे. मात्र प्रकल्पाला सात वर्ष विलंब झाल्याने आणि प्रकल्पात काटकसर करूनही ४०० कोटी वाढले. रेडीरेकनर दरही वाढल्याने महापालिकेला भूसंपादनापोटी भरावे लागणाऱ्या रक्कमेतही २८ कोटींची वाढ झाली. असे एकंदरीत ४२८ कोटींचे बजेट वाढले.
फेज वन
एकूण बाधित मिळकती : १३७
खासगी मिळकतींची संख्या : १००
भूसंपादन करून ताब्यात घेतलेल्या मिळकती : ६०
शासकीय मिळकती : ३७ (शासनाकडे प्रस्ताव आहे)
दोन खासगी मिळकतींचा विषय विभागीय आयुक्तांकडे प्रस्तावित आहे.
फेज दोन
एकूण बाधित मिळकती : ९६
खासगी मिळकतींची संख्या : ८२
शासकीय मिळकती : १४
मार्गाची पुनर्मोजणी करण्यात आली असून त्यासंबंधिचे शुद्धिपत्रक दुरुस्ती