Roads

 

Tendernama

पश्चिम महाराष्ट्र

डांबरीकरणासाठी १० कोटींचे टेंडर; रस्त्यांच्या कामाला मिळणार गती

टेंडरनामा ब्युरो

कोल्हापूर (Kolhapur) : शहरातील रस्त्यांच्या कामासाठी सरकारचा १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, डागडुजी आणि काही ठिकाणी गटर्सची कामे करण्यात येतील. यासाठी टेंडर प्रसिद्ध झाले असून, याचा फॉर्म शासनाच्या https://mahatenders.gov.in या संकेतस्ळावर याबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे.

महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून त्यासाठी सातत्याने निधी मागणी होत होती. त्यासाठी राज्य शासनाचा १० कोटी रुपायांचा निधी मंजूर करण्यात आला. यातून शहरातील रस्त्यांचे डांबरिकरण होणार आहे. ज्या ठिकाणी रस्त्या खूप खराब आहेत तेथे नवे रस्ते करण्यात येतील. काही गटर्स आणि पादचारी मार्गाची कामेही या निधीतून होणार आहेत. यातील बहुतांशी रस्ते हे शहराच्या दक्षिण भागातील आहेत. ऑनलाईन अर्ज व बयाणा रक्कम भरण्याची मुदत ३१ जानेवारी सकाळी ९.३० ते २४ फेब्रुवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत आहे. २८ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता ही निविदा उघडली जाणार आहे. निविदा अर्ज संकेतस्थळावरून प्राप्त करून भरायचा आहे. सविस्तर टेंडर नोटीस अटी, शर्ती या सर्व गोष्टी महापालिका कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष पहायला मिळेल. अशी माहिती शहर अभियांता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली आहे.

रंकाळा सुशोभिकरण

रंकाळा सुशोभिकरणाची टेंडर प्रसिद्ध झाली असून लवकरच याचेही काम सुरू होणार आहे. यासाठी नगरविकास विभागाकडून १५ कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यातील ९ कोटी ८४ लाखाची रक्कम महापालिकेकडे वर्ग करण्यात आली आहे. यातून सुशोभिकरणाची कामे केली जाणार आहेत. प्रामुख्याने मुख्य प्रवेशद्वार, पदपथ उद्यान, बैठक व्यवस्था, विविध प्रकारचे आउटडोअर गेम्स यासह अन्य सुशोभिकरणाची कामे सुरू करण्यात येतील.