मुंबई (Mumbai) : बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि पॉवर कपल रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणने 119 कोटींना स्वप्नातील आशियाना खरेदी केला आहे. इतकेच नव्हे तर हे अपार्टमेंट शाहरूख खानचा 'मन्नत' आणि सलमान खानच्या गॅलेक्सी बंगल्याच्या मध्यावर आहे. रणवीर सिंहने सागर रेशम रेसेडेंशियल टॉवरमध्ये हे आलिशान घर खरेदी केले आहे. रणवीर-दीपिकाची ही घर खरेदी देशातील काही महागड्या घर खरेदींपैकी एक असल्याची चर्चा आहे. (Ranveer Singh Deepika Padukone News)
या घरामधून त्यांना बँडस्टॅण्ड आणि सुंदर अरबी समुद्र पाहता येईल. रणवीर सिंहने एक नवीन घर खरेदी केले आहे. या अर्पाटमेंटचे अजून बांधकाम पूर्ण झालेले नाही. तिथून अरबी समुद्राचे सुंदर दृष्य पाहता येते. रणवीर सिंहने हे घर 119 कोटींना खरेदी केलेले आहे. रणवीर सिंहचे अपार्टमेंट या टॉवरमधील १६व्या, १७व्या, १८व्या आणि १९व्या मजल्यावर आहे. यात एकूण ११ हजार २६६ चौरस फूट कार्पेट एरिया आहे. या घराबरोबर रणवीर सिंहला १९ पार्किंग एरिया मिळाले आहेत. रणवीर सिंह-दीपिका पदुकोणचे हे नवे घर अभिनेता शाहरुख खानच्या 'मन्नत' आणि सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटच्या मध्यभागी आहे.
रणवीर सिंहने ओह फाईव्ह मीडिया वर्क्स एलएलपीच्या माध्यमातून ही घर खरेदी केली आहे. या कंपनीत रणवीर सिंहचे वडीलच संचालक आहेत. रणवीरने घर खरेदीपोटी ७.१३ कोटींची स्टॅम्प ड्यूटी भरली आहे. रणवीरचा अलीकडेच 'जयेशभाई जोरदार' हा सिनेमा आला होता. त्याचबरोबरच त्याचा बिअर ग्रील्ससोबत 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'चा एपिसोडही नुकताच प्रदर्शित झाला आहे.
रणवीरचा रोहित शेट्टीसोबत 'सर्कस' नावाचा सिनेमा येणार आहे. त्याचबरोबर करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हे चित्रपटही लवकरच रिलीज होणार आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणवीर सिंह कॉफी विथ करण शो मध्येही गेला होता.