Chipi Airport, Nath Pai Tendernama
मुंबई

कोकणच्या सुपूत्राचा असा होणार सन्मान; कोकणातील 'या' विमानतळाला...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कोकणचे सुपूत्र बॅरिस्टर नाथ पै (Br. Nath Pai) यांचा सन्मान करणारा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला (Chipi Airport) 'बॅरिस्टर नाथ पै विमानतळ' असे नाव देण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने काल शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाने त्यास मंजुरी दिली.

बॅ. नाथ पै यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. त्यांनी स्वातंत्र लढ्यामध्ये सहभाग घेतला व वेळोवेळी कारावास भोगला. गोवा मुक्ती संग्रामात देखील ते अग्रेसर होते. स्वातंत्र्योत्तर कालावधीत त्यांनी राजापूर लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधीत्व केले.

कोकण रेल्वेच्या संकल्पनेमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. बॅरिस्टर नाथ पै यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. हे औचित्य लक्षात घेवून चिपी परुळे येथील ग्रीनफिल्ड विमानतळाला बॅ. नाथ पै विमानतळ असे नाव देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. हा प्रस्ताव विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधील सदस्यांच्या मान्यतेने केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल.