मंबई (Mumbai) : श्रीनगर (Srinagar) ते लेह-लडाख (Leh-Ladakh) मार्गावर बांधण्यात येत असलेल्या झोजिला बोगद्याचे (Zozila) काम वेगाने सुरु आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यावर लेह-लडाख उर्वरीत देशाशी बाराही महिने रस्ते मार्गाने जोडला जाईल. हा 'सिल्क रूट' भारतीय लष्करासाठी सुध्दा सामरिक दृष्टीने तेवढाच महत्वाचा आहे. त्यामळे सोनमार्ग ते मीनामार्ग या प्रवासासाठी ४ तासांऐवजी केवळ ४० मिनीटे लागणार आहेत. या प्रकल्पामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख क्षेत्राच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. मेघा इंजिनिअरींग आणि इन्फ्रास्ट्क्चर लिमिटेडकडे (MEIL) या प्रकल्पाचे काम सोपवण्यात आले आहे.
बोगद्याची उंची जवळ जवळ हिमालयाच्या शिखराएवढी आहे. हा भाग बर्फाच्छादित असतो, तर किमान तापमान उणे ४० अंश इतके कमी असते अशा वातावरणातही कंपनीचे काम जोरात सुरु आहे. या बोगद्याच्या बांधकामात मेघा इंजिनिअरींगने नवीन ऑस्ट्रियन बोगदा खणण्याची पद्धत, बर्फ काढण्यासाठी स्नो ब्लोअरसारख्या आधुनिक यंत्रांचा वापर केला जात आहे. आतापर्यंत 40 ते 45 टक्के काम पूर्ण झाले असून वेळेतच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. या प्रकल्पाच्या बांधकामासाठी एकूण 1,268 आधुनिक आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि उपकरणे वापरली जात आहेत, तर दोन हजार लोक काम करत आहेत.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये-
- 17 किमी लांबीचा रस्ता
- एकूण तीन बोगदे
- पहिला बोगदा (निलगार बोगदा-1) लांबी 468 मीटर
- दुसरा बोगदा (निलगार बोगदा-II) लांबी- 1,978 मीटर
- दोन्ही बोगदे ट्विन ट्यूब टनेल आहेत.
- तिसरा झोजिला बोगदा, लांबी 13 किमी
- मार्गावर 815 मीटरचे एकूण चार पूल