NHAI Tendernama
मुंबई

NHAI: 889 किमी राष्ट्रीय महामार्गासाठी 16,000 कोटींचे मॉनिटायझेशन

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्ट या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्टने ८८९ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गासाठी इन्व्हाईट राऊंड तीनद्वारे सोळा हजार कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे उभारलेले हे सर्वात मोठे मुद्रीकरण (मॉनिटायझेशन) आहे. हा भारतीय रस्ते क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या व्यवहारांपैकी एक व्यवहार आहे. या तिसऱ्या फेरीत नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्टने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून सात हजार कोटी रुपयांचे युनिट भांडवल, भारतीय कर्जदारांकडून नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज आणि पंधरा हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त सवलतीचे शुल्क उभारले आहे.

या युनिट्सना सध्याच्या आणि नवीन अशा दोन्ही गुंतवणूकदारांकडून मोठी मागणी आली. तिसऱ्या फेरीनंतर इन्व्हाईटच्या तिन्ही फेऱ्यांचे एकूण मूल्य २६ हजार १२५ कोटी रुपये एवढे झाले आहे. आसाम, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या नऊ राज्यांमध्ये पंधराशे किलोमीटर लांबीच्या १५ ऑपरेटिंग टोल रस्त्यांचे खाते नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्टकडे आहे.