Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Tendernama
मुंबई

Navi Mumbai : महापालिका दोन ठिकाणी जलउदंचन केंद्र उभारणार; 71 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई महापालिकेच्यावतीने ७१ कोटी ८४ लाख खर्चून सीबीडी आणि वाशी परिसरात पर्जन्य जलउदंचन केंद्र लवकरच उभारले जाणार आहे. लवकरच या दोन्ही कामांसाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे.

पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक पद्धतीने निचरा होऊ शकत नसल्याने त्याला पर्यायी उपाययोजना म्हणून नवीन पावसाळी जलउदंचन केंद्र उभारण्यात येणार आहे. सीबीडी बेलापूर या परिसरात पावसाळ्यादरम्यान पाणी साचते, त्यामुळे सीबीडी येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊ नये, याकरिता नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने नवी मुंबई महापालिकेने येथील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविण्याचे कामे हाती घेतली आहेत.

वाशी येथील जलउदंचन केंद्राचा अपेक्षित खर्च ३७ कोटी ३१ लाख व बेलापूर जलउदंचन केंद्राचा अपेक्षित खर्च ३४ कोटी ५३ लाख इतका येणार असल्याचे आ. म्हात्रे यांनी सांगितले. या दोन्ही पर्जन्य जलउदंचन केंद्रांमुळे वाशी आणि बेलापूर येथील पाणी साचण्याचा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केला.