BKC Traffic Jam News मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) वांद्रे ते कुर्ला पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी टेंडर (Tender) प्रसिद्ध केले आहे. (Bandra To Kurla Pod Taxi Project)
कुर्ला-बीकेसी-वांद्रे (BKC) भागातील वाहतूक कोंडी (Traffic Jam) सोडविण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पासाठी १,०१६ कोटींचा खर्च अपेक्षित असून कंत्राटदारांना (Contractors) २५ जूनपर्यंत टेंडर भरता येणार आहे. सार्वजनिक-खासगी-भागीदारी (PPP) तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि या भागातील प्रवाशांना जलद प्रवासाचे साधन उपलब्ध व्हावे, याकरिता 'एमएमआरडीए'ने वांद्रे ते कुर्ला पॉड टॅक्सी प्रकल्प हाती घेतला आहे.
या प्रकल्पाचे टेंडर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मार्चमध्ये काढण्यात आले होते. त्यावेळी २० मेपर्यंत टेंडर दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर 'एमएमआरडीए'ने या टेंडरला १२ जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा टेंडरला मुदतवाढ देण्यात आली आहे. हे टेंडर आता २६ जूनला खुले केले जाणार आहे.
वांद्रे ते कुर्ला या ८.८ किमी अंतरावर ही पॉड टॅक्सी धावणार आहे. वांद्रे-कुर्लादरम्यान प्रवासासाठी प्रवाशांकडून १८४ रुपये भाडे आकारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी १ हजार १६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, सार्वजनिक-खासगी-भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
कंत्राटदाराची नियुक्ती केल्यानंतर प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी २४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे, तर कंत्राटदाराला ३० वर्षांसाठी सवलत कालावधी दिला जाणार आहे.