Hancock Bridge Tendernama
मुंबई

दहिसर टू मीरा रोड अवघे १२ मिनिटांत होणार शक्य; २ हजार कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईचे पश्चिम उपनगरातील शेवटचे टोक असलेल्या दहिसरपासून मीरा रोड-भाईंदर गाठणे आता फक्त १२ मिनिटात शक्य होणार आहे. मुंबई महापालिका सुमारे २ हजार कोटी खर्च करुन उड्डाणपूल बांधणार आहे. दहिसर कांदळपाडा ते मिरारोड येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत ५ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल असणार आहे.

देशाची आर्थिक राजधानीचे व आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांच्या संख्येतही भर पडत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी व वाहन पार्किंगची समस्या भेडसावत आहे. विशेषतः उपनगरातून मंत्रालय, सीएसएमटी, चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या नागरिकांना वाहनाने प्रवास करणे त्रासदायक ठरत आहे. तसेच दहिसरपासून मीरा रोड, भाईंदर आदी ठिकाणी वाहनांने प्रवास करणेही अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने दहिसर ते मिरा रोड, भाईंदर मार्गे प्रवास करणे सुलभ व जलद होण्यासाठी २ हजार कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या २ हजार कोटींपैकी ४०० कोटी रुपये जमीन संपादनासाठी खर्च करण्यात येणार आहेत, असे मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून दहिसर ते मीरा रोड-भाईंदरपर्यंत उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेतर्फे दहिसर कांदळपाडा ते मिरारोड येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत ५ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.