Penguin Tendernama
मुंबई

बापरे! पेंग्विनचा दिवसाचा खर्च माहितीये?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईतल्या विरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातला (Jijabai Bhosale Udyan) पेंग्विन (Penguin) दिवसभर काय खातो आणि कसा जगतो हे माहित नाही, पण एका दिवसाला लाख रुपये खात असल्याचे म्हणजे त्याचा देखभाल खर्च लाख रुपये जात असल्याचे सरकारी बाबूंनी कागदोपत्री दाखविले आहे. आजवरचा हा खर्च पाहता एवढा पैसा पेंग्विनवर खर्च होतोय की बाबूच गिळंकृत करताहेत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

मुंबई महानगर पालिकेने (Mumbai Municipal Corporation) भायखळा येथील उद्यानात असलेल्या पेंग्विनवर 43 दिवसात 45 लाख 84 हजारांचा वाढीव खर्च केला आहे. दिवसाला साधारण लाखाहून अधिकच खर्च पेंग्विनवर होत आहे. पेंग्विनच्या देखभालीसाठी महानगर पालिकेने 11 सप्टेंबर 2018 लाख तीन वर्षांचे कंत्राट दिले होते. या कंत्राटाची रक्कम 11 कोटी 46 लाख रुपयांची होती. हे कंत्राट सप्टेंबर 2021 ला संपणार होते. मात्र, नव्या कंत्राटदाराची नियुक्ती न झाल्याने पालिकेने या कंत्राटदाराला मुदतवाढ दिली आहे. सुरवातीला 43 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. या मुदतही नवा कंत्राटदार न आल्यास याच कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यात येणार आहे.

पालिकेने गेल्या 43 दिवसांपासून कंत्राटदाराला अतिरिक्त खर्चापोटी 45 लाख 84 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेत मांडण्यात आला आहे. मुंबई महानगर पालिकेने पेंग्विनच्या देखभालीसाठी मागवलेल्या टेंडरवर वाद निर्माण झाल्याने सुधारीत टेंडर मागविण्यात आले होते. आता टेंडर भरण्याची मुदत संपली असून, महिना भरात नव्या कंत्राटदाराची नियुक्ती होण्याची शक्‍यता आहे.

टेंडरनामाच्या फेसबुक पेजला लाईक करा - https://www.facebook.com/tendernama

टेंडरनामाच्या ट्विटर पेजला फॉलो करा - https://twitter.com/tendernama