मुंबई (Mumbai) : मुंबई मेट्रो-३ (Mumbai Metro-3) या महिना अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (MMRC) 12 मार्च रोजी आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स या मार्गावर मेट्रोची यशस्वी चाचणी घेतली. मुंबई मेट्रो-3 ला ॲक्वा लाईन (Aqua Line) असेही म्हटले जाते.
सिग्नलिंग, टेलिकम्यूनिकेशन्स, ट्रॅक इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रॅक्शन सिस्टमसह ट्रेन्सच्या सुसंगततेची पडताळणी करून सुरळीत कामकाज निश्चित करणे हे या चाचण्यांचे उद्धिष्ट आहे. मेट्रो प्रणालीची सुरक्षा आणि कार्यक्षमता निश्चित करण्यासाठी ही सर्वसमावेशक चाचणी प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे.
सर्व यशस्वी चाचण्यानंतर मेट्रोला इंडिपेंडेंट सिक्युरिटी असेसर प्रमाणपत्र दिले जाईल. सर्व आवश्यक प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर महामंडळ प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरी दिली जाईल. मंजुरी मिळाल्यानंतर मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा लोकांसाठी खुला केला जाईल.
आरे-बीकेसी मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर येथे सुमारे 9 मेट्रो गाड्या धावणार आहेत. मात्र यातील दोन मेट्रो ट्रेन दुरुस्ती आणि स्टँडबाय कामांसाठी ठेवण्यात येणार आहेत. या ट्रेन सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालणार आहे. ॲक्वा लाईनचा हा कॉरिडॉर 33.5 किमी पर्यंत विस्तारित आहे. या मार्गावर एकूण 10 स्थानके आहेत. या स्थानकांवर दररोज सुमारे 260 राउंड-ट्रिप सेवा उपलब्ध असतील. जेणेकरून प्रवास करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने फ्रेंच कंपनीकडून सुमारे 31 गाड्या खरेदी केल्या आहेत. त्यापैकी आतापर्यंत फक्त 11 ट्रेनची डिलिव्हरी झाली आहे. यापैकी फक्त 9 गाड्या चालवल्या जाणार आहेत. इतर दोन गाड्या दुरुस्तीसाठी आणि स्टँडबाय म्हणून ठेवल्या जातील.