Metro Tendernama
मुंबई

Mumbai Metro 11 : 'ही' कंपनी करणार ग्रीन लाईन मेट्रोच्या भू-तांत्रिक माती परीक्षणाचे काम

Green Line : वडाळा - सीएसएमटी 18 किमीची मार्गिका प्रस्तावित

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : वडाळा ते सीएसएमटी ही १८ किलोमीटर लांबीची मेट्रो ११ मार्गिका (ग्रीन लाईन) प्रस्तावित आहे. या मेट्रोमुळे कासारवडवली ते वडाळा मेट्रो ४ मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट दक्षिण मुंबईत सीएसएमटी येथे पोहोचता येणार आहे.

मेट्रो ११ ही मुंबईतील तिसरी भूमिगत मार्गिका असेल. तसेच ही भूमिगत मेट्रो १५ भूमिगत स्थानकांद्वारे अनिक बस डेपो ते एसपीएम चौकाला जोडेल. मुंबई मेट्रोच्या भूमिगत मेट्रो-११चे संरेखन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने पूर्ण केले आहे.

मेट्रो मार्ग-३ (एक्वा लाईन) आणि लाईन-७ ए (रेड लाईन) नंतर ही मुंबईतील तिसरी भूमिगत मार्गिका असेल. कासारवडवली ते वडाळा मेट्रो ४ मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट दक्षिण मुंबईत सीएसएमटी येथे पोहोचता येणार आहे. यासाठीच वडाळा ते सीएसएमटी मेट्रो ११ ही मार्गिका प्रस्तावित करण्यात आली.

या मार्गिकेवर अनिक बस डेपो, वडाळा डेपो, सीजीएस कॉलनी, गणेश नगर, बीपीटी हॉस्पिटल, शिवडी, हे बंदर, कोळसा बंदर (दारुखाना), रे रोड, भायखळा, नागपाडा जंक्शन, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट येथे १५ भूमिगत स्थानके बांधण्याची योजना आहे. सीएसएमटी मेट्रो (मेट्रो-३ एक्वा लाईनसह इंटरचेंज), हॉर्निमन सर्कल आणि एसपीएम सर्कल ही स्थानके प्रस्तावित आहेत.

नुकतेच जिओमरीन डायनॅमिक्स इंडिया प्रा. लिमिटेड (जिओमार्डी) कंपनीला १८ किमी मुंबई मेट्रो लाईन-११ (ग्रीन लाईन) साठी भू-तांत्रिक माती परीक्षणाचे काम मिळाले आहे.

या भू-तांत्रिक तपासणीचे उद्धिष्ट हे आहे की, यातील संरचनेची तपशीलवार रचना तयार करण्यात मदत करण्यासाठी आणि बांधकामादरम्यान योग्य यंत्रसामग्री, पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी पुरेसा डेटा असणे हे आहे. हे सर्व्हेक्षण बांधकाम टप्प्यात विद्यमान संरचनांना कमीतकमी संभाव्य नुकसान सुनिश्चित करण्यात देखील मदत करेल.

'एमएमआरसीएल'च्या टेंडरनुसार, भू-तांत्रिक तपासणीसाठी १५० मि.मी.चे बोरहोल प्रत्येक स्टेशनच्या साईट एरियामध्ये आवश्यक असलेल्या ३ बोरहोल्ससह ट्विन बोगद्याच्या संरेखनात ५०० मीटरच्या अंतराने खोदावे लागतील. हे बोअरहोल १० मीटर खोलीपर्यंत, १०-२० मीटर दरम्यान आणि २० मीटरच्या पुढे आवश्यकतेनुसार खोदले जातील.