मुंबई (Mumbai) : बहुप्रतीक्षित मुंबई गोवा महामार्गाचे (Mumbai Goa Highway) काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केली होती. मात्र आता मार्च 2024 आधी महामार्गाच्या दोन्ही बाजूंचा सर्व ठिकाणचा दुहेरी मार्ग पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
एका कार्यक्रमात मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, बीओटी तत्त्वावर असल्यामुळे हा प्रकल्प चर्चेत राहिला. कोकणातल्या व्यक्तींना गणपती अगोदर पूर्ण झाला पाहिजे, असे वाटत होते. जमीन अधिग्रहण हा सगळ्यात मोठा भाग होता. कोकणात प्रत्येकाच्या जमिनी कमी आहेत. 100 टक्के भूसंपादन झाले नसल्यामुळे कामात विलंबाची प्रक्रिया होत होती. वन खात्याकडून परवानग्या मिळाल्या नाहीत, त्यामुळे विलंब होत राहिला. कोर्ट कचेऱ्या, लालफितीमध्ये प्रकल्प अडकला होता.
कंत्राटदार अकार्यक्षम आहेत, अशा प्रकारची परिस्थिती होती. 10 वर्षांची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती यात तफावत होती, त्यामुळे 10 वर्षांपुर्वी अगोदर त्यांना कंत्राट मिळाले होते. पूर्वी हे पॅकेज दोन-तीन ठेकेदारांकडे होते. आता ते दहा ठेकेदारांकडे आहे. सिंधुदुर्ग ते राजापूर भाग पूर्ण झाला आहे. सुरुवातीचा पनवेल ते इंदापूर 42 किमीची सिंगल लेन पूर्ण झाली आहे, उर्वरित दुसरी लेन डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. कासू पासूनचा उरलेला भाग 42 किमीचा आहे. त्याच्यामधील सिंगल लेन पूर्ण झाली. सीटीबीचे 17 किमीचे कामही पूर्ण झाले आहे.
अडचणी वेगळ्या आहेत, त्यामुळे डेडलाईन वेगवेगळी आहे. कासूपर्यंतचा भाग मार्चपर्यंत पूर्ण होईल, कारण त्यामध्ये मोठे पूल आहेत. ते पूल पूर्ण होण्यासाठी एक वर्ष लागणार आहे. एल ऍण्ड टी कंपनीचे काम कोणत्याही परिस्थितीमध्ये जानेवारीमध्ये पूर्ण होईल. मार्च 2024 आधी महामार्गाच्या दोन्ही बाजूंचा सर्व ठिकाणचा दुहेरी मार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण होईल. ब्रीजेस आहेत त्याचे ऑडिट करणे अपेक्षित होते. छोटे पूल सहा महिन्यांत पूर्ण होतील, मोठ्या पुलाला एक वर्ष लागेल, अशीही माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली.