ST Mahamandal Tendernama
मुंबई

ST वाहकांना लवकरच नवे ऍन्ड्राईड तिकीट मशीन; ‘ईबिक्स’ला टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्यभरातील वाहकांना नवीन ऍन्ड्रॉईड ईटीआय तिकीट मशिन पुरविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. नवीन ऍन्ड्रॉईडईटीआय मशीन हे “एक वाहक, एक मशिन” या प्रमाणे देण्यात येणार आहे. ऍन्ड्रॉईड ईटीआय मशिन वाहक व चालक तथा वाहकासआगार स्तरावर पुरवठा करण्याचे टेंडर ईबिक्स कॅश कंपनीला देण्यात आले आहे.

आगारातील भांडार शाखेकडून नवीन ऍन्ड्रॉईड ईटीआय मशिन कॅश व इश्यू विभागामध्ये काम करणारे रोखपाल यांच्याकडे हस्तांतरकेले जाणार आहे. नवीन ऍन्ड्रॉईड ईटीआय मशिन, चार्जर व मशिन कव्हर सह वाहक व चालक तथा वाहक यांच्या नावावर नोंद होईल, त्यासाठी स्वतंत्र रजिस्टर तयार करून नोंदी ठेवण्याच्या सूचना महामंडळाने दिल्या आहेत. अतिरिक्त असणाऱ्या ऍन्ड्रॉईड ईटीआयमशिन, चार्जर व मशिन कव्हरची जबाबदारी ही कॅश व इश्यू विभागामध्ये काम करणारे लिपिक, वाहतूक नियंत्रक तसेच संबंधितकर्मचाऱ्यांवर देण्यात आल्या आहेत.

तर ऍन्ड्रॉईड ईटीआय मशिन नादुरुस्त झाल्यास दुरुस्तीला पाठविताना ईटीआय मशीनच्या बॉक्समध्येच आगारातील भांडार शाखेकडूनपाठविण्यात यावेत. सर्विस सेंटर आगाराच्या जवळ असल्यास सर्विस सेंटरला मशिन थेट पाठविण्यात याव्यात. अन्यथा विभागीय भांडारशाखेमार्फत पाठविण्यात याव्यात. ऍन्ड्रॉईड ईटीआय मशिन हे काळजीपूर्वक हाताळावे, नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती करण्याचीजबाबदारी ईबिक्स कंपनीची राहील. मात्र ऍन्ड्रॉईड ईटीआय मशिन व चार्जर डॅमेज, गहाळ किंवा चोरी झाल्यास त्याची संपूर्णजबाबदारी वाहकाची राहणार असल्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. तर ऍन्ड्रॉईड ईटीआय मशिन चार्जिंग करीता पुरविण्यातआलेल्या चार्जर व्यतिरीक्त अन्य कोणतेही चार्जर किंवा चार्जरच्या इतर साधनांचा वापर करु नये अशाही सूचना सुद्धा एसटीमहामंडळाने दिल्या आहेत.