accident tendernama
मुंबई

समृद्धीवरच्या दुर्घटनेत नेमकं काय घडलं?; जाणून घ्या इनसाईड स्टोरी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : सोमवारी (ता. ३१) रोजी रात्री ११.३० वाजता लॉचिंग गर्डर दुसऱ्या दिवसाची पूर्व तयारी करण्यासाठी हलवत असताना क्रेन (सेगमेंट लॉचर) पूर्ण झालेल्या गर्डरसह ३५ मीटर उंचीवरून पियर क्रमांक १५-१६ मध्ये अचानक कोसळले. या ठिकाणी सुमारे १७ कामगार, ४ अभियंते व ७ कर्मचारी असे एकूण २८ जण दुसऱ्या दिवसाची पूर्व तयारी करत होते. या दुर्घटनेत १० कामगार, २ अभियंते व ५ कर्मचारी असा एकूण १७ जणांचा मृत्यू झाला असून, ०३ गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी २ ज्युपिटर रुग्णालयात तर १ शहापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ३ कामगार हे लाँचरच्या सांगाड्याखाली दबले असल्याची शक्यता असल्याने त्याचे शोधकार्य प्रगती पथावर असल्याचा खुलासा एमएसआरडीसीने केला आहे.

इगतपुरी ने मुंबई दरम्यान सुरु असलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामा दरम्यान मोजे सरलावे ता. शहापुर जि. ठाणे येथे अत्याधुनिक लॉचर कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचे ७०१ किमी पैकी ६०० किमी चे काम पूर्ण झालेले असून, हा महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आलेला आहे. उर्वरित नाशिक व ठाणे जिल्ह्यातील १०२ किमीचे काम प्रगतीपथावर आहे. शहापुर तालुक्यातील सरलावे किमी ६६७/३०० सुमारे २२८ किमी लांबीच्या पुलाचे काम सुरु आहे. या पुलाचे बांधकाम अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत असून बांधकामाकरीता कंत्राटदार नवयुगा इंजिनियरिंग कंपनीने कीएसएल उडिया सिंगापूर कंपनीला हे काम दिले आहे.

या स्वयंचलित लॉचरमार्फत एकूण ११४ गाळ्यांपैकी १८ गाळ्यांचे बांधकाम या कंपनीने यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. ३१ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता लॉचिंग गर्डर दुसऱ्या दिवसाचा पूर्व तयारी करतानाच ही दुर्घटना घडली, यातील पाच कर्मचारी सुरक्षित असल्याचे एमएसआरडीसी प्रशासनाने सांगितले आहे. व्हाइट पुलाचा सांगाडा व स्वयंचलित लाँचरचा सांगाडा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे कार्यकारी अभियंता सुरेश अभंग यांनी सांगितले आहे.