Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

कुठे गेली दुभाजकातील रंगरंगोटी; कठड्यालाही भेगा

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर - जालना राष्ट्रीय महामार्गावरील कॅम्ब्रिज चौक ते नागेवाडी टोलनाक्यापर्यंत काळवंडलेल्या व अत्यंत कमी उंची असलेल्या दुभाजकाची उंची वाढवून रंगरंगोटी करण्यात आली होती. मात्र काही महिन्यांतच त्याची नवीन कामाची झळाळी गायब झाली आहे. दुभाजकाचे बांधकाम देखील निकृष्ट झाल्याने त्यावर तडे गेलेले आहेत.

छत्रपती संभाजीनगर - जालना रोडवरील कॅम्ब्रिज नाका ते टोलनाक्यापर्यंतच्या रस्ता दुभाजकाची उंची व त्यामधील कठड्यांची रंगरंगोटी करण्यात आली. हे काम पुढे चालू असतानाच काही महिन्यातच वाहनांच्या धुरामुळे पाठीमागे केलेल्या नवीन सिमेंटचा दुभाजक काही महिन्यांतच काळवंडून गेल्याने रात्रीच्या वेळी अंधारात दिसत नसल्याने अपघाताला आमंत्रण मिळत होते.

तसेच कमी उंचीच्या  दुभाजकामुळे अपघाताचा दुहेरी त्रास सहन करावा लागत असे. यावर 'टेंडरनामा'ने सातत्याने वृत्तमालिका लावून सार्वजनिक बांधकाम विभागीत जागतीक बॅंक प्रकल्प शाखेला जागे केले. त्यानंतर या मार्गावरील दुभाजकाची उंची वाढवने व त्यामधील कठड्याला  काळ्या - पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्यात काम सुरू करण्यात आले. मात्र पुढे काम चालू असताना काही महिन्यांतच पाठीमागे केलेल्या दुभाजकाची नवीन झळाळी गायब झाली आहे.

शिवाय दुभाजकाच्या नवीन कामावर देखील भेगा पडल्याने हे काम निकृष्ट पद्धतीने केल्याचा पुरावा ठरत आहे. त्याचबरोबर संबंधित ठेकेदाराकडून दुभाजकामध्ये व दुभाजकालगत साचलेली माती, केरकचरा उचलून स्वच्छ करण्यात येत नसल्याने धूळ व माती उडण्याचे प्रमाण वाढल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दुभाजकात झाडे लावण्यास देखील ठेकेदाराकडून कंजुसी केली जात आहे.

खाजगीकरणाअंतर्गंत या मार्गाची देखभाल दुरुस्तीचा ठेका मुंबईच्या सद्भाव प्रकाश जाॅईंट व्हेंचर या कंपनीला दिला आहे. मंजूर टेंडरच्या अटीशर्तीनुसार १ फेब्रुवारी २००६ ते ३१ जुलै २०३० या कालावधीत अर्थात २३ वर्ष सहा महिन्यांपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचा खर्च वसुलीसाठी टोलनाक्याअंतर्गत त्याला सवलत दिलेली आहे. मिनिबस किंवा तत्सम वाहने ७५ रुपये, ट्रॅक व बस १५० रुपये, अवजड वाहने ट्रॅक, ट्रेलर व यापेक्षा अधिक आसनांच्या वाहनांकडून २६० रुपये वसुली केली जाते. मात्र रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे कायम दुर्लक्ष केले जाते. येथील प्रसाधनगृहाची देखील वाईट अवस्था असल्याचे नागरिकांनी सांगितले.