Hospital Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar News : मराठवाड्यासाठी गुड न्यूज; 'ते' रुग्णालय आता झाले 400 खाटांचे

टेंडरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajianagar छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरातील २०० खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालयाची मुख्य इमारत व‌ अधिकारी - कर्मचारी निवासी इमारतीचे ८० टक्के बांधकाम झाले आहे. सद्यस्थितीत इमारतीच्या कामावर ९०.८९ इतका खर्च झाला आहे तर माता व बालसंगोपन इमारत व अतिरिक्त ५ व्या व ६ व्या मजल्याच्या कामावर ५ कोटी ३ लाखांचा खर्च झाला आहे.

बांधकाम विभागाकडे साडेनऊ कोटीचा निधी शिल्लक आहे.‌ मधल्या काळात निधी नसल्याने‌ कंत्राटदाराने बांधकाम थांबवले होते. कामाची मुदत ३० महिने होती. २६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र सरकारनेच निधीची पूर्तता न केल्याचे लक्षात आल्यावर कंत्राटदाराला सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता यांच्या ३ जानेवारी २०२४ च्या पत्रानुसार २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.‌ त्यानंतर रुग्णालयाच्या या भव्य सहा मजली इमारतीचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून दारे, खिडक्या, रंगरंगोटी, विद्युतीकरण तसेच सुशोभीकरणाचे काम देखील अंतीम टप्प्यात आले आहे.

दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य विभाग देखील पुढील कामकाजात लागल्याने मराठवाड्यासह इतर शहरातील रुग्णांचा जिल्हा सामान्य रुग्णालय व‌ घाटीवरील ताण कमी होणार आहे.‌ दरम्यान २०० खाटांचे माता व बालसंगोपन इमारतीचा यात समावेश केल्याने आता २०० खाटांऐवजी ४०० खाटांचे हे मराठवाड्यातील पहिले रुग्णालय होणार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.‌

छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेकडून सध्या शहरात ३९ आरोग्य केंद्रे, ०५ रुग्णालये चालविण्यात येतात. परंतु दर्जेदार आरोग्य सुविधा नागरिकांना मिळत नाही. रुग्णालये, आरोग्य केंद्रांमध्ये किरकोळ आजारांवर उपचार केले जातात. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये घाटी रुग्णालयावरील ताण प्रचंड वाढला आहे.

आरोग्य सुविधांसाठी केवळ जिल्हा सामान्य रुग्णालय आणि घाटी रुग्णालय हे दोनच पर्याय असल्याने तेथील वाढत्या रुग्णांचा ताण कमी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात २०० खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालयाची मुख्य इमारत व अधिकारी कर्मचाऱ्यांची निवासी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी ४२१० वैद्यकीय सेवा सार्वजनिक आरोग्य , ०१ नागरी आरोग्य सेवा (वैद्यकीय सहाय्य) ११० - रुग्णालय व‌ दवाखाने.‌ पंचवार्षिक योजनेअंतर्गत - इमारती ( ००)(०१) मोठी बांधकामे (४२१०-००१४) , ९३ मोठी बांधकामे या लेखाशिर्षाखाली आरोग्य विभागाने १११ कोटी ८९ लाख ६१ हजार रुपयांची २० सप्टेंबर २०१९ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती.‌

इमारतींच्या बांधकामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील शासकीय दूध डेअरीची न.भु. क्रमांक १३७८९ येथील २१८५३ चौ.मी.‌ जागा उपलब्ध करून दिली.‌ सदर जागा इमारतीच्या बांधकामासाठी आरोग्य विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे १८ ऑगस्ट २०२० रोजी हस्तांतरित करण्यात आली.‌ यानंतर‌ इमारतीच्या स्थापत्य कामांसाठी ७७ कोटी ९२ लाख ४९ हजार ४४८ रूपयांची सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता  ३० सप्टेंबर २०२० रोजी तांत्रिक मान्यता दिली. तर विद्युत कामांसाठी १० कोटी ४५ लाख ६३ हजार ६६७ रुपयांची मान्यता पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे मुख्य अभियंत्यांनी १० ऑक्टोबर २०२० रोजी तांत्रिक मान्यता दिली होती.

जून २०२०-२१ मध्ये इमारतीच्या बांधकामाचे ८९ कोटी ८३ लाख ६१ हजार २६३ रुपयांचे टेंडर स्विकृत करण्यात आले होते. यात १ टक्का कमी दराने टेंडर भरल्याने ८६ कोटी ५७ लाख १ हजार ९०७ रुपये‌ इतक्या रकमेचे टेंडर अंतिम करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील हायटेक इन्फ्रा या कंत्राटदाराला २७ मे २०२१ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले होते.३० महिन्याच्या कालावधीत अर्थात २६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत कंत्राटदाराला इमारतीचे बांधकाम पूर्ण करायची मुदत दिली होती. मात्र सरकारने मधल्या काळात निधीची पुर्तता न केल्याने कंत्राटदाराने काम थांबवले होते.‌

तद्नंतर मुख्य अभियंत्यांच्या ३ जानेवारी २०२४ च्या पत्रान्वये कंत्राटदाराला २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. याच दरम्यान इमारतीचे २०० खाटांचे माता व बालसंगोपण इमारतीचे बांधकाम करणे व २०० खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय इमारतीचा ५ व ६ वा मजल्याच्या अतिरिक्त कामासाठी एन.एच.एम.५.२.१.६. जिल्हा परिषदेच्या जिल्हा एकात्मिक आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ३८ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता दिल्याने २०० खाटांचे हे रुग्णालय तब्बल चारशे खाटांचे झाले आहे.

राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगरवासीयांसाठी एक मोठे पाऊल उचलल्याने तब्बल १११ कोटी रुपये खर्च करून आता लवकरच येथील आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणा मजबूत करताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळही लागणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने देखील इतक्या मोठ्या रुग्णालयासाठी तातडीने शासनाकडे मनुष्यबळ पुरविण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या हालचाली आत्तापासूनच सुरू केल्या आहेत. एकीकडे रुग्णालयाच्या बहुमजली इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले असताना दुसरीकडे मनुष्यबळाचा प्रस्ताव पाठविला जाणार असल्याने आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी ही जमेची बाजू आहे.

असा आहे बांधकामाचा तपशिल

२०० खाटांचे माता व बालसंगोपन केंद्र
२०० खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय
५ वा व ६ वा मजला

मुख्य इमारत : पाचवा+ सहावा मजला
३१५१.४४.+ ३५३८.४६=६६८९.९० चौ.मी.
पाचवा मजला - पेयींग वार्ड (एक खाट- आठ रुम )
पी.एन.सी.‌वार्ड (४० खाटा) ऄ.एन.सी. वार्ड (४० खाटा)उद्वाहक यंत्र (५ स्ट्रेचर, ३ - सर्वीस) रॅम्प/ ४ जिने, रिफ्युज एरिया (३२८.३० चौ.मी.)

सहावा मजला: पी.एन.सी. वार्ड (४० बेड)ऄ.एन.सी. वार्ड (४० खाटा) डाॅक्टर रुम, काॅन्फरन्स, मिटींग हाॅल उद्वाहक यंत्र (५ स्ट्रेचर, ३ - सर्वीस) रॅम्प/ ४ जिने.ई. रिफ्युज एरिया (३२८.३० चौ.मी.)

अतिरिक्त कामाची अंदाजपर्कीय रक्कम २५ कोटी ४ लाख एक हजार ७१ रुपये

कामावर झालेला खर्च : एप्रिल २०२४ अखेर
५ कोटी ३ लाख

कामाची सद्यस्थिती : पाचव्या मजल्याचे आर.सी.सी. चे काम प्रगतीत.

मुख्य इमारतीच्या कामाचा असा आहे तपशील

- मुख्य इमारत - ३६९८.०७ +  बेसमेंट पार्किंग - ३८३५.८४ + वरिष्ठ तळ - ३८४०.३२ + चार मजले - ३५३८.४६ + ३४८०.३२ + ३५३८.४६ = २१५७१.४७ चौ.मी.

- बेसमेंन्ट पार्किंग मजला - किचन,कैंटिन, दिनेश स्टोर व वाॅशिंग, ड्रक स्टोअर, रेकाॅर्ड रूम, वेस्ट करेक्शन, टु व्हिलर व कार पार्किंग, ५ जिने इलेक्ट्रिकल रुम, उद्वाहक यंत्र

- वरिष्ठ तळ मजला - ॲडमिन ब्लाॅक, रजिस्ट्रेशन, डिस्पेनसिंग, ओ.पी.डी. क्लिनिकल लॅब, रॅम्प, ४ जिने, कार पार्किंग, ४ जिने, उद्वाहक यंत्र (५ स्ट्रेचर, ३ - सर्वीस)

- पहिला मजला - डीईआयसी युनिट,  पेडायट्रीक वार्ड(४० खाटा) एस.एन.सी.यु. (३६ खाटा) रॅम्प व ४ जिने, उद्वाहक यंत्र (५ स्ट्रेचर, ३ - सर्वीस)

- दुसरा मजला - एल.डी.आर.ब्लाॅक (१८ खाटा) डीईआयसी युनिट,  पेडायट्रीक वार्ड(४० खाटा) रॅम्प व ४ जिने, उद्वाहक यंत्र (५ स्ट्रेचर, ३ - सर्वीस)

- तिसरा मजला - आय.सी.यु  (१० खाटा) एच.डी.यु.
(२०खाटा) एस.एन.सी.यु. (३६ खाटा) ओ.टी.ब्लाॅक
रॅम्प व ४ जिने, उद्वाहक यंत्र (५ स्ट्रेचर, ३ - सर्वीस)

- चौथा मजला - एम.एन.सी.  (४० + ४० खाटा) पेयींग रूम रॅम्प व ४ जिने, उद्वाहक यंत्र (५ स्ट्रेचर, २ - सर्वीस)

निवासी इमारती

- टाईप - १ :- पार्किंग+ सहा मजले (२४ नं) १ *१८४०.०८ १८४० चौ.मी. १ इमारत

टाईप - २  :- पार्किंग+ सहा मजले (४८नं) २ *२१०२.२२ = ४२०२.४४ चौ.मी. २ इमारत

टाईप - ३  :- पार्किंग+ सहा मजले (१२नं) १ *१३९४.२९ = १३९४. २९ चौ.मी. १ इमारत

- टाईप - ४  :- पार्किंग+ एक मजला (१नं) १ * २५८.६२ =२५८.६२  चौ.मी.१ इमारत

- निवासी इमारत पूर्ण बिल्टप क्षेत्र= ७६९७.४३ चौ.मी.

- सद्यस्थितीत कामावर झालेला एकुत खर्च - ९० कोटी ८९ लाख

- कामाची अंतिम मुदत - २६ ऑगस्ट २०२४