Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

संभाजीनगरवासियांसाठी गुड न्यूज; आता घर बसल्या करा स्मार्ट बसचे तिकीट बूक अन् लाईव्ह ट्रॅकिंग

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : स्मार्ट सिटीतर्फे चालवण्यात येणाऱ्या माझी स्मार्ट बस आता प्रवाशांसाठी अजून स्मार्ट झाली आहे. बुधवारपासून स्मार्ट बस प्रवाशयांसाठी “चलो“ ऍप उपलब्ध होईल. ज्याद्वारे प्रवाशी स्मार्ट बसची लाईव्ह ट्रॅकिंग करू शकतील, ऑनलाइन तिकीट व पास खरेदी करू शकतील, येणाऱ्या बसमध्ये किती सीट उपलब्ध आहेत याची माहिती घेऊ शकतील व यासोबत अन्य सुविधेंचा लाभ घेऊ शकतील

मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी आयुक्तपदी रुजू झाल्यापासून स्मार्ट बसला खऱ्या अर्थाने स्मार्ट करण्याचे लक्ष ठेवले होते. त्यानुसार स्मार्ट शहर बस विभाग कार्य करत होता. बुधवार पासून ‘चलो’ ऍप च्या माध्यमाने आता मोबाइल मधे गूगल प्ले स्टोअर वर बस ट्रैकिंग साठी चलो ऍप डाउनलोड करता येईल, अशी माहिती स्मार्ट शहर बसचे मुख्य व्यवस्थापक संजय सुपेकर यांनी दिली. याद्वारे प्रवाशी ऑनलाइन घरी बसल्या तिकीट खरेदी करू शकतील, पासेस बनवून घेऊ शकतील.यासाठी यू पीआयआय, नेट बैंकिंग डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा मोबाईल वॉलेटच्या माध्यमाने पैसे भरता येतील. “चलो” ऍप द्वारे बसेस ची लाईव्ह ट्रैकिंग करता येईल म्हणजे कोणत्या बस थांब्यावर बस किती वेळात येईल, हे या ऍप द्वारे प्रवाशांना कळेल.‌ सोबतच येणाऱ्या बस मध्ये किती खाली सिट उपलब्ध आहेत हे ही समजून जाईल.

प्रवाशांना चलो कार्ड रिचार्ज करून वापर करता येईल. याद्वारे तिकिटाचे पैसे देण्यासाठी जेवढी गरज तेवढा टॉपअप करावा लागेल, अशी माहिती स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक फैज अली यांनी दिली. या प्रकल्पासाठी सीईओ जी.श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड, शहर बसचे मुख्य व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक फैज अली, बसचे उप व्यवस्थापक प्रमोद देशमुख, विलास काटकर, चलोच्या संस्थापक प्रिया सिंह, वरिष्ठ अधिकारी व्ही. पी. अरुण,  गिद्रोनिया व शहर प्रमुख शुभम निंबलवार कार्य करत आहेत. 

काय म्हणाले जी. श्रीकांत

रेल्वे मध्ये टी. सी. म्हणून माझ्या अनुभवामुळे या तंत्रज्ञानाचा महत्व मला समजले. जरी बसला उशीर होत असेल पण बसच्या येण्याचा वेळ माहिती असला तर त्यानुसार स्टॉपवर पोहोचता येतो. आता चलो ऍपच्या माध्यमाने नागरिक स्मार्ट शहर बसचा पुरेपूर फायदा घेऊ शकतात.