Nala safai Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : राज्यातील 'MNP'चा नालेसफाईचा फंडा वापरल्यास...

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : तत्कालीन महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांण्डेय यांनी छत्रपती संभाजीनगरातील नालेसफाईचा पावसाळ्यापूर्वीच तीन महिन्यांअगोदर पायंडा घातला. उल्लेखनीय बाब म्हणजे नालेसफाईत ठेकेदारांची 'हात की सफाई' रोकण्यासाठी महापालिकेच्या स्वतःचा मशिनरीद्वारेच नालेसफाईचा निर्णय घेतला होता. त्यासाठी आवश्यक लहान व मोठे पोकलॅन्ड, टिप्पर, जेसीबी  खरेदी करत शहरातील नालेसफाईचं काम सुरु केले. परिणामी दरवर्षी १०१ नालेसफाईसाठी लागणाऱ्या पाच कोटी ऐवजी आता केवळ ३० लाखात नालेसफाईचे काम छत्रपती संभाजीनगर महापालिकेमार्फत केले जात आहे.

पाण्डेय यांच्या बदलीनंतर आलेल्या डाॅ. अभिजित चौधरी यांनी देखील पुढे हाच फ॔डा वापरला. परिणामी शहरातील छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील अधिकार्यांचा बचतीचा हा फंडा राज्यातील इतर  महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषदांनी अमलात आणल्यास सरकारचा कोट्यावधी रूपयांचा निधी वाचेल व हा बचत झालेला पैसा इतर विकास कामासाठी वापरता येईल, यासाठी भाजप व शिवसेना शिंदे गटातील सरकारने लक्ष घालने गरजेचे आहे. महापालिकेच्या नियोजनबध्द पद्धतीत नाले सफाई केल्यामुळे मागील तीन वर्षात मुसळधार पावसामुळे झालेले प्रकार देखील टाळत आहेत. यापूर्वी ठेकेदारामार्फत पाच ते सहा कोटी खर्च करून देखील थातुरमातुर पद्धतीने नालेसफाई होत होती. परिणामी  शहरातील  नाल्यात, व  सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत होते. हा प्रकार देखील आता होत नसल्याचा दावा महापालिका प्रशासन करीत आहे. 

गेल्या चार वर्षांपासून महापालिकेतर्फ शहरातील नाल्यांच्या सफाईचे काम नेहमीपेक्षा तीन महिन्याच्या आगोदरच  सुरू करण्यात येते. विशेष म्हणजे कुठलेही टेंडर न काढता , ठेकेदार न लावता नालेसफाईचे काम महापालिकेच्या यंत्रणेद्वारे करण्यात येत आहे. योग्य नियोजनामुळे हे काम कमीत कमी खर्चात आणि उत्तमरित्या पार पडत आहे. तत्कालीन मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांनी ठेकेदार लाॅबीतील खाबुगिरीला चाप बसविण्यासाठी  छत्रपती संभाजीनगरातील पावसाळ्यापूर्वी तीन महिन्याअगोदरच नाले साफसफाई करण्याचे काम सुरू करण्याचा पायंडा घातला होता. यासाठी कोट्यावधी रूपयाची मशिनरी महापालिका फंडातून खरेदी केली. यात शहरातील ९ झोनसाठी ९ जेसीबी, ९ टिप्पर, ३ पोकलॅन्ड व छोट्या नाल्यांसाठी  १ पोकलॅन्ड अशी व्यवस्था केली होती. केवळ ६ ट्रॅक्टर तासिका तत्वावर भाड्याने घेण्यात येतात. तत्कालीन शहर अभियंता सखाराम पानझडे व कार्यकारी अभियंता बी. डी. फड ह्यांचा नेतृत्वाखाली, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता आर. ई. पंडित व उप अभियंता अमोल कुलकर्णी यांच्या व तसेच सर्व  वार्ड अभियंता यांच्या मदतीने पांण्डेय यांनी  हे काम सुरू केले होते. आता चौधरी यांच्या नंतर नवनियुक्त प्रशासक डाॅ. जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता आविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या नाल्यांमध्ये मशिनरी वापरून सफाई होत आहे व छोट्या नाल्यांमध्ये फावडा व अन्य उपकरण वापरून सफाई होत आहे.

शहरातील १०१ नालेसफाईचं काम हाती

गेल्या चार वर्षात शहरातील झोन क्रमांक १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, व ९मध्ये अत्यंत नियोजन पध्दतीने नालेसफाईच्या कामाला सुरूवात करण्यात येते. याही वर्षी एप्रिल महिन्यातच  कामास सुरुवात करण्यात आली आहे. शहरात १५५.५५ किलोमीटरचे १०१ नाले आहेत. या नाल्यांची साफसफाई करून पावसाळ्यासाठी सज्ज राहण्याच्या यशस्वी प्रयत्न महापालिका  करीत  आहे. तत्कालीन  प्रशासकांच्या मागील निर्णयानुसाल  यासाठी ठेकेदार  न नेमता महापालिका उपलंध्ब साधनसामुग्री द्वारेच कमी मनुष्यबळात  स्वतःची यंत्रणा वापरत नाले सफाई करत आहे. याद्वारे  नाल्यातील घाण काढून नाले व्यवस्थित वाहतील याची व्यवस्था करण्यात येत आहे.  हे कार्य शहर अभियंता सखाराम पानझडे सेवानिवृत्त झाल्यानंतर नवनिर्वाचित शहर अभियंता आविनाश देशमुख व कार्यकारी अभियंता बी. डी. फड ह्यांचा नेतृत्वाखाली, उत्तमरित्या सुरू आहे. 

तब्बल वीस ते २५ कोटीची बचत

नियोजनबद्ध पद्धतीत व महापालिका स्वतःच्या यंत्रणेद्वारे नाले सफाई करत असल्यामुळे मागील चार वर्षात वीस ते २५ कोटीची बचत झाली आहे. यापुर्वी टेंडर काढुन ठेकेदार नेमला जात असल्याने दरवर्षी ५ ते सहा कोटी रूपये खर्च केला जात असे. इतके कोटी खर्च करूनही दरवर्षी मुसळधार पावसामुळे झालेला प्रकार टाळता येत नसत. नाल्यात, शहरात सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडल असत. मात्र मागील चार वर्षापासून महापालिक  स्वतःची यंत्रणा लावून हे काम तीन महिन्या आगोदरच सुरु करत असल्याने कोट्यावधी रूपयात बचत होऊन नागरिकांचा त्रास देखील कमी झाला आहे.