Road work Tendernama
मराठवाडा

17 कोटींच्या निधीतून औरंगाबाद जिल्ह्यातील रस्ते होणार चकाचक

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्याची मोहिम जिल्हा परिषदेने (Aurangabad Zilla Parishad) हाती घेतली असून, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात खराब झालेल्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून त्यासाठी १७ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मिळाला असून, त्यातून ही विकासकामे केली जाणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीकडून कार्यकाळ संपण्यापूर्वीच १७ कोटी ८१ लाख रुपयांतून जिल्ह्यातील ८६ ग्रामीण रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण करणार येणार आहेत. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) काही तालुक्यातील रस्ते आणि पूल वाहून गेले होते. अनेक गावांशी संपर्क तुटला होता. सध्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाने डागडुजी करून तात्पुरते मार्ग सुरू केले आहेत. मात्र रस्त्यांचे मजबुतीकरण आणि पुलांची नव्याने बांधणी करणे गरजेचे असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेने सरकारला सादर केला होता. त्यातील 86 कामांना मंजुरी मिळाली आहे.

कोणत्या मार्गासाठी किती निधी?

- जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीने फुलंब्री तालुक्यातील 13 रस्त्यांच्या कामासाठी सर्वाधिक ३ कोटी ४७ लाख निधी मंजूर केला आहे.

- औरंगाबाद तालुक्यातील १६ रस्त्यांच्या कामासाठी मंजुरी मिळाली असून यासाठी १९ लाख रुपये मंजूर केले आहेत.

- पैठण तालुक्यातील १२ रस्त्यांसाठी २ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला.

- गंगापूर तालुक्यातील १० रस्त्यांना एक कोटी ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

- सिल्लोड तालुक्यातील ८ रस्त्यांसाठी १ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी

- सोयगाव तालुक्यातील ५ रस्त्यांच्या कामासाठी ९३ लाख रुपये निधी

- खुलताबाद तालुक्यातील ६ रस्त्यांच्या कामासाठी 9९४ लाख रुपये

- वैजापूर तालुक्यातील ६ रस्त्यांसाठी १ कोटी ७५ लाख रुपये

- कन्नड तालुक्यातील १० रस्त्यांसाठी १ कोटी ६७ लाख रुपये मंजूर करण्यात आले