Nagpur Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : धक्कादायक! निम्म्या नागपूर शहरातील कचरा संकलन बंद

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : विविध मागण्यांवरून कर्मचारी व कचरा संकलन (Garbage Collection) करणाऱ्या कंपन्यांच्या वादात दिवसेंदिवस भर पडत असून, त्यामुळे नागपूरकरांना वेठीस धरले जात आहे. आता एजी एन्व्हायरो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन केले. परिणामी लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर या पाच झोनमधील कचरा घरांमध्येच तुंबून पडला आहे.

मागील महिन्यांत बीव्हीजी या कचरा संकलन करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक सुटीच्या दिवशीचे वेतन कपात केल्याने अचानक संप पुकारला होता. त्यामुळे गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर व मंगळवारी झोनमधील घरांतील कचरा उचलण्यात आला नव्हता. कंपनीसोबत कर्मचाऱ्यांच्या वादाचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहेच, शिवाय शहराच्या स्वच्छता सर्वेक्षणालाही धक्का बसत आहे.

कंपनीसोबतचा वाद कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या पातळीवर सोडवावा, त्यासाठी सामान्यांना वेठीस का धरता, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. कर्मचाऱ्यांनी कुठलीही नोटीस न देता संप पुकारला असल्याचे एजी एन्व्हायरो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.