road Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा करू आंदोलन; 'या' संघटनेने दिला इशारा

टेंडरनामा ब्युरो

वर्धा (Wardha) : पांढरकवडामार्गे नांदगाव चौरस्ता वरून शहरात जाणाऱ्या मार्गाची दुरावस्था झाली आहे. हा दोनपदरी रस्ता संपूर्ण खड्डेमय झाला असल्याने नागरिकांना या मार्गावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे बांधकाम करणे अती आवश्यक झाले आहे.

नांदगाव चौरस्ता वरून शहरात जाणाऱ्या मार्गाची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. हा दोनपदरी रस्ता संपूर्ण खड्डेमय झाला असल्याने या रस्त्यावरुप प्रवास करणे म्हणजे यम लोकांची यात्रा करण्यासारखी अवस्था आहे. या संबंधात येथील सामाजिक संघटना तसेच जनमंचाच्यावतीने हा रस्ता दुरुस्त करावा नाहीतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर व या रस्त्याच्या मधोमध मोठे आंदोलन उभारू, असा इशारा एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित वरिष्ठांना दिले आहे. त्यामुळे हा रस्ता आता बळी घेतल्यानंतरच दुरुस्त होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या संबंधात येथील सामाजिक संघटना जनमंचने त्वरित हा रस्ता दुरुस्त करावा, नाहीतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर व या रस्त्याच्या मधोमध मोठे आंदोलन उभारू, असा इशारा एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित वरिष्ठांना दिला आहे.

वाहन चालविताना होतोय त्रास :

बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी वाहनचालकांच्या संपूर्ण शरीराच्या अवयवांची खिळखिळी होत आहे. त्यामुळे हा रस्ता आहे की, यमलोकाचा प्रवास असा अनुभव या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्यांना येते. इतकी वाईट अवस्था या रस्त्याची झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून या रस्त्याच्या दुरुस्तीबद्दल अनेक वेळा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना कळविण्यात आले. मात्र रस्ता मंजूर आहे लवकरच काम सुरू होईल, असे चालढकलीचे उत्तर देऊन वेळ मारून नेत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याचे नूतनीकरणाचे काम केव्हा सुरू करेल, याचा नेम नाही. मात्र या रस्त्याकडे संपूर्णपणे डोळेझाक केल्या जात असल्याने वाहनचालकांना व रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना एक वेगळा अनुभव येत आहे.

वाहतूक मोठी तरीही दुरुस्ती नाहीच :

या रस्त्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, अभियंता, लोकप्रतिनिधी, या तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी व शेकडोंच्या संख्येमध्ये पालकवर्ग या रस्त्यावरून ये-जा करतात. त्यानंतरसुद्धा या रस्त्याची परिस्थिती वाईटपेक्षा अति वाईट झालेली आहे. संपूर्ण शहरात असलेल्या रस्त्यामध्ये या रस्त्याची दयनीय अवस्था पाहून आपण कुठे आहे, असा प्रश्न पालकांना व विद्यार्थ्यांना अनुभवास येत आहे इतके असल्यावरही व या संबंधात वारंवार सूचना करूनही आतापर्यंत तात्पुरता रस्ता दुरुस्तीचे कामसुद्धा झालेले नाही. त्यामुळे संबंधित विभाग किती जागृत आहे, याची प्रचीती जनतेला येत आहे. हा रस्ता आता बळी घेतल्यानंतरच दुरुस्त होणार का, हा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या संबंधात येथील सामाजिक संघटना जनमंचने त्वरित हा रस्ता दुरुस्त करावा नाहीतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर व या रस्त्याच्या मधोमध मोठे आंदोलन उभारू, असा इशारा एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित वरिष्ठांना दिले आहे.