Nagpur  Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : खुल्या जागेत फेकला जातो कचरा

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : आमच्या प्रभागात कचरा उचलण्यासाठी नियमित कचऱ्याची गाडी येत नाही. त्यामुळे घरातील कचरा ठेवायचा कुठे, असा प्रश्न निर्माण होतो. अनेकजण खुल्या जागेवर कचरा टाकून मोकळे होतात. ओला कचरा असल्यामुळे त्याला घाण वास येतो. कचरा गाडी वेळेवर येत नसल्यामुळे हा प्रकार होत आहे. नगरसेवक आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु, नगरसेवक लक्ष देण्यास तयार नाही. अधिकाऱ्यांना माहिती देऊनही अर्जाला केराची टोपली दाखविण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी जावे कुठे, असा प्रश्न निर्माण होतो. खुल्या जागेवरील कचरा आता नागरिकांच्या आरोग्यावर उठला आहे.

- सोनल झाडे