तगादा : 'या' थोर मराठी साहित्यिकाचा नागपूर महापालिकेकडून अनादर

Ram Shevalkar
Ram ShevalkarTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : विद्यावाचस्पती, वक्ता दशसहस्त्रेषु अशा विविध बिरुदावलीने प्राचार्य राम शेवाळकर (Ram Shevalkar) यांची ओळख. मराठीसह इतरही साहित्य क्षेत्रामध्ये त्यांच्या नावाचे मोठे वलय आहे. कोसो दूर त्यांची ख्याती पोहोचलेली आहे. मात्र, नागपूर महापालिकेने त्यांच्या राहत्या घरासमोर लावलेल्या फलकातून या थोर आणि नागपूरकरांसाठी भूषण असलेल्या मराठी साहित्यिकाचा अनादर करण्यात आला आहे.

Ram Shevalkar
10, 12 वीच शिक्षण टेन्शन नको; एमआयडीसीत 1100 पदांसाठी होणार भरती

महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने नागपूर महापालिकेच्या आयुक्तांपुढे या चुकांना घेऊन प्रश्‍न उपस्थित केले आहेत. गांधीनगर परिसरामध्ये प्राचार्य राम शेवाळकर यांचे घर आहे. त्यांच्या स्मृती जपता याव्यात आणि सन्मानाखातर नागपूर महापालिकेतर्फे या घरासमोर ‘नगर भूषण’ असा उल्लेख करीत मराठी साहित्यिकाचा हिंदी भाषेत व सदोष फलक लावला आहे. महापालिकेने केलेल्या या अनादरामुळे साहित्य क्षेत्रातून आश्‍चर्य व्यक्त केल्या जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com