तगादा : संभाजीनगरमधील विजयंतनगरात रस्त्याची समस्या; चिखलातून करावी लागते पायपीट

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सातारा परिसरातील गट क्रमांक १४४ विजयंतनगर येथील काॅलनीत येणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे पावसाच्या गढूळ पाण्याने भरले असून रस्ता चिखलाने माखला आहे. अशा रस्त्यावरून चालताना महिला, बच्चेकंपनीची बेजारी सुरू आहे. ही अडचण लक्षात घेऊन सदरील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : वारंवार खोदकामावर सातारा-देवळाईकर का संतापले?; बघा मनपाला काय दिला इशारा

काॅलनीतील या मुख्य रस्त्यावरून नागरिकांची वर्दळ सुरू असते. रस्त्याची स्थिती पाहून तर या रस्त्यावरून फेरीवाले, भाजी-फळ विक्रेते आणि पाण्याचे टँकर, शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारी वाहने काॅलनीत येत नसल्याने सगळ्यांचे हाल होत आहेत. विशेषतः या भागात मनपाची पाणीपुरवठा योजना नसल्याने नागरिकांची टॅकरवर मदार आहे. मोठा पाऊस नसल्याने बोर देखील कोरड्याठाक पडल्या आहेत.आधीच रस्ता पार खड्ड्यात गेलेला. त्यात पडलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत आहे. शिवाय या रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाली नसल्याने रस्त्यावर पाणी साठून राहत आहे. तर रस्त्यावर चिखल होत आहे. घाणपाण्यातून आणि चिखलाने माखलेल्या रस्त्यावरून नीट चालता येत नसल्याने महिला, बच्चेकंपनीची बेजारी सुरू आहे. हा रस्ता ये-जा करण्यासाठी अडचणींचा झाला आहे. तर दुचाकी चालकांसाठी धोकादायक झाला आहे. दुचाकी स्लिप होत असल्याने दुचाकी चालक, पाठीमागे बसलेल्या महिला, विद्यार्थी , जेष्ठ नागरिक खाली पडून जखमी होत आहेत. हा रस्ता मनपा बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असून दुरावस्था झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने महिला, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र हे काम प्रत्यक्ष सुरू होण्यास पावसाळा होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : कंत्राटदार, मनपाच्या वादात 1 लाख नागरिकांची प्रवासासाठी कसरत

छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटीत समावेश झालेल्या सातारा-देवळाईतील परिसरातील रस्ता सध्या चिखलमय झाला आहे. यामुळे वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. पादचारी, वाहन चालकांसह शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या रस्त्याकडे पाहुण खरोखरच आपण स्मार्ट सिटीत राहतोय का , असा प्रश्न विजयंतनगरातील नागरिकांना भेडसावत आहे. काॅलनीत जवळपास एक   हजार नागरिकांना पावसाळ्यात दररोज चिखल तुडवत व खड्डे चुकवत ये-जा करावी लागते.या दोन किलोमीटर अंतरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. शिवाय, अनेक ठिकाणी रस्त्यावर माती असल्याने चिखल झालेला आहे. रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना पायी चालणे व वाहनधारकांना वाहन चालवणे अवघड झालेले आहे.या रस्त्यावर काॅलनीवासीयांचे मोठ्या प्रमाणावर दळणवळण असल्यामुळे आणि सातारा-देवळातील जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना काॅलनीत दुध - फळे भाजी विकण्यासाठी जाण्यासाठी हा रोड महत्त्वाचा आहे. काॅलनीत जाण्यासाठी नागरिकांना पर्यायी मार्ग नसल्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती संबंधित बांधकाम विभागाने लवकरात लवकर करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे. या रस्त्यालगत करण्यात आलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत व भुमिगत गटार योजनेंतर्गत मलनिःसारण वाहिनी टाकल्याने साईटचा रस्त्याचा चिखल हा रस्त्यावर आल्याने या रोडवर गाडी चालवणे देखील अवघड झाले आहे. साईटचा चिखल हा रस्त्यावर आल्याने नागरिकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, प्रतिनिधीने चार तास थांबून या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसह पादचाऱ्यांची होणाऱ्या गैरसोयीची पाहणी केली आहे. संबंधित बांधकाम विभागाने तात्काळ काम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. या रस्त्यावरून अनेक शालेय विद्यार्थी ,विद्यार्थिनी शाळेत जात असतात त्यांनाही या चिखलातुन प्रवास करणे कठीण झाले आहे.  

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com