नागपूर (Nagpur) : सदर परिसरातून जाणाऱ्या उड्डाणपुलावर अनेक दिवसांपासून तटलेला केबल वायर पडून आहे. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. मात्र तो वायर उचलण्याची तसदी कोणीच घेत नाही.
नागपूर महापालिका, वाहतूक विभाग आणि राष्ट्रीय महामार्गाचे प्रशासन यापैकी एकही विभाग याची जबाबदारी घेण्यास तयार नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाने सदर येथे उड्डाण पूल तयार केला आहे. आता उड्डाण पुलाच्या देखरेखीची जबाबदारी एमएसआरडीसीची आहे. मात्र शहरातील दैनंदिन समस्या सोडवण्याचे काम महापालिकेचे आहे. त्यामुळे कोणीही केबल उचलण्यास तयार नाही. एखादा मोठा अपघात झाल्यावरच तो उचलल्या जाईल असे दिसते.