तगादा : देखभालीच्या वादातून नाशिक बसस्टॅण्डची दुरावस्था

Nashik
NashikTendernama
Published on

नाशिक (Nashik) : महापालिकेच्या महानगर वाहतूक महामंडळाच्या सिटीलिंककडून सध्या शहर बससेवा राबवली जात आहे. ही सेवा हस्तांतरीत करताना शहरातील एसटीचे बसस्टॅण्ड सिटीलिंक कंपनीकडून वापरले जात आहेत. त्यापोटी एसटीला भाडेही दिले जात आहे. मात्र, या बसस्टॅण्डमध्ये मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे तेथे सर्व चिखल झाला आहे. या बसस्टॅण्डची दुरावस्था झाली आहे.

Nashik
तगादा : पाईपलाईनच्या कामामुळे नागरिक त्रस्त; जागोजागी खोदल्याने...

या बसस्टॅण्डची देखभाल कोणी करायची, याबाबत करारात काहीच नमूद नसल्यामुळे एसटी व सिटीलिंक यांच्यात याबाबत मतभेद असून त्याचा फटका सामान्य प्रवाशांना बसत आहे. एस.टी.ने स्थानकांवर काम करावे असा पवित्रा सिटी लिंक प्रशासनाने घेतला आहे. तर सिटी लिंकने आधी चार कोटींहून अधिक थकीत भाडे रक्कम जमा करावी, असे एस.टी.चे अधिकारी सांगत आहेत. एस.टी. आणि सिटी लिंकच्या या वादात प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

Nashik
तगादा : गडचिरोली जिल्हा रुग्णालयात छत गळतीमुळे खाटा रिकाम्या

गेल्या दोन वर्षांपासून एस.टी.च्या मालकीचे निमाणी, नाशिकरोड, भगूर या बसस्थानकांचा वापर नाशिक महापालिकेची सिटीलिंक बससेवा करत आहे. त्यापोटी एसटीने रेडीरेकनर दराने भाडे आकारले आहे. गेल्या दोन वर्षांतील सिटीलिंककडील ही थकीत रक्कम आता चार कोटींच्या पुढे गेली आहे. याबाबत सिटीलिंकने भाडे रक्कम द्यावी, असे एसटीचे अधिकारी म्हणतात. एसटीने बसस्थानकांवर देखभाल, दुरुस्तीची कामे करावी, असेसिटी लिंक म्हणते. एकमेकांकडे बोट दाखविण्याच्या याखेळात सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत.

Nashik
Nashik: नाशकातील त्या रखडलेल्या प्रकल्पाचा खर्च 18 वरून 35 कोटींवर

काही वर्षांपूर्वीच निमाणी बसस्टॅण्ड येथे खासदार स्थानिक विकास निधी १ कोटी २५ लाख रुपये खर्चून निमाणी बसस्थानकाचे रूप पालटण्यात आले होते. त्याचवेळी येथे अनेक सोयीसुविधाही देण्यात आल्या होत्या. आता स्थानकात प्रचंड खड्डे अन् चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानकाचे छत कधीही कोसळू शकते अशी अवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशी या भर पावसातही बसस्टॅण्डमध्ये थांबण्याऐवजी थेट रस्त्यावर उभ राहणे पसंद करतात.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com