तगादा : सरकारी जमिनीवर अतिक्रमण वाढले, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष?

Yavatmal
YavatmalTendernama
Published on

यवतमाळ (Yavatmal) : तालुक्यात वाढते अतिक्रमण हे सामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरत असताना अधिकारी मात्र सुस्त आहेत. ते सामान्य नागरिकांच्या तक्रारीला अथवा कोणत्याही आदेशाला जुमानत नसल्याचे वाढत्या अतिक्रमणांवरून स्पष्ट होत आहे. वणी नगरपालिका काही प्रमाणात तरी शहरांतील अतिक्रमणाकडे लक्ष देते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील आजूबाजूच्या जागेवर होणाऱ्या अतिक्रमणाकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. 

Yavatmal
Nagpur : अजून होणार पाणीटंचाई कारण कामे अडकली आचारसंहितेत

वरोरा रोड, यवतमाळ रोड, चारगाव रोड, घोन्सा रोड, भालर रोड, नांदेपेरा रोड अशा प्रमुख महामार्गावर अतिक्रमणाची समस्या गंभीर झाली आहे. महामार्गावरील फुटपाथवर अतिक्रमण करण्यात आल्याने पादचारी नागरिकांचे हाल होत आहेत. महामार्गावरील या अतिक्रमणांचा वाहतुकीला अडथळा होत असून सातत्याने प्रमुख चौकांमध्ये वाहतूककोंडीची समस्याही निर्माण होत आहे. महामार्गावरील अतिक्रमणे काढण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. मात्र, येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला कोणी वालीच नसल्याने अतिक्रमणधारकांचे चांगलेच फावले आहे. वणी बांधकाम विभागाची धुरा ज्या अधिकाऱ्याच्या खांद्यावर आहे, ते अधिकारी केवळ आठवड्यातून दोनदा दुपारी बिलावर सह्या करायला यवतमाळवरून वणी कार्यालयात येतात. पायी चालणाऱ्या नागरिकांच्या जागेवरच दुकानदारांनी आपले दुकाने थाटली असल्याने सामान्य नागरिकांना मात्र वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावरून चालावे लागत आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे अपघाताचे प्रमाणात वाढत आहे. सामान्य नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

Yavatmal
Mumbai : बीएमसीच्या मुदतठेवींना का लागली उतरती कळा? अवघ्या 2 वर्षांत 10 हजार कोटींची घट

अधिकारी म्हणतात, ही जबाबदारी महसुलची महामार्गावरील अतिक्रमणे काढण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे हे सर्वश्रुत असताना येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हितेश राठी यांनी अतिक्रमण काढणे तहसीलदार व एसडीओच्या अखत्यारीत असते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढणे आमच्या हातात नाही, असे सांगून नवीन जावई शोध लावला.

फुटपाथ झाले गायब, वाहतुकीची कोंडी : 

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती ते साई मंदिर सिमेंट- काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून, या महामार्गावर लोकमान्य टिळक महाविद्यालय ते बसस्थानकपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणाऱ्या फुटपाथवर विक्रेत्यांनी अतिक्रमण करून आपला संसार थाटला आहे. या परिसरामध्ये लोकमान्य टिळक महाविद्यालय, तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, न्यायालय, पंचायत समितीसमोर असलेल्या फुटपाथवरच अतिक्रमण करण्यात आल्याने नागरिकांना नालाजाने महामार्गावरून चालावे लागते. यामुळे अपघात होण्याची शक्यता असून विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com