Nagpur
NagpurTendernama

तगादा : पाईपलाईनच्या कामामुळे नागरिक त्रस्त; जागोजागी खोदल्याने...

Published on

नागपूर (Nagpur) : गोधनी रेल्वे परिसरात पाणी पुरवठा योजनेसाठी चांगले रस्ते खोदून पाईपलाईन टाकण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावर माती पसरून चिखल झाला आहे. वाहने चालविताना चालकांना प्रचंड त्रास होत असून अपघात वाढले आहेत. खड्डे लवकरात लवकर पूर्ववत न केल्यास आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

Nagpur
Mumbai: बेस्टला मिळेना पुरवठादार; अखेर घ्यावा लागला कटू निर्णय

गेल्या काही महिन्यांपासून गोधनी परिसरातील विविध ले-आऊटसमध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी ठिकठिकाणी डांबरी रस्ते खोदण्यात येत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, नाल्यासाठी ऐन रस्त्याच्या काठावरच मोठमोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. परिणामी जागोजागी गिट्टी, मुरूम व माती पसरल्याने चिखल होऊन रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. चिखलात वाहने घसरून अपघात होत आहेत. खोदकामामुळे काही ठिकाणी केबल तुटल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले, त्यांचे फोनही बंद होते. पाईपलाईनच्या कामामुळे विशेषतः आरती टाऊन, म्हाडा कॉलनी, लोखंडे ले-आऊट, जमील ले-आऊट व आजूबाजूच्या वस्तीमधील नागरिक सध्या खूप त्रस्त आहेत.

Nagpur
Nagpur : फुटाळ्यावर कायमस्वरूपी बांधकाम करणार नाही, शपथपत्र द्या

बांधकामात अनियमिततेचा आरोप

स्थानिकांच्या मते, कंत्राटदाराने नाल्या तयार केल्या, पण त्या व्यवस्थित बुजविल्या नाहीत. तर काही ठिकाणी थातुरमातुर काम केले आहे. तक्रार केली असता कंत्राटदार फोन उचलत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात सरपंचांकडेही गाहाणे मांडले. पण समस्या सुटली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. पाईपलाईनच्या कामावर प्रशासन लाखो-करोडोंचा खर्च करत आहे. मात्र हे काम योग्य पद्धतीने होत नसल्याचा नागरिकांना आरोप आहे. यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचे एड. सेवतकर यांचे म्हणणे आहे.

Tendernama
www.tendernama.com