तगादा : देयके द्या, अन्यथा काम बंद आंदोलन; जलजीवन मिशन कामाच्या ठेकेदारांचा इशारा

Jal Jeevan Mission
Jal Jeevan MissionTendernama
Published on

सोलापूर (Solapur) : सोलापूर जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागांतर्गत सुरू असलेल्या जलजीवन मिशनमधील कामांची ठेकेदारांची देयके जिल्हा परिषदेकडे प्रलंबित आहेत. ती येत्या आठ दिवसांत द्या, अन्यथा २० सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी दिली. तसेच याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले.

Jal Jeevan Mission
Solapur : छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्काम केलेल्या 'त्या' वास्तूसाठी 1.49 कोटी; टेंडर प्रक्रियाही पूर्ण

जलजीवन मिशनच्या कामांना मुदतवाढ देताना विनादंड मुदतवाढ द्या, जादा दाराच्या निविदांना लवकर प्रशासकीय मान्यता द्या, या कामांसाठी नैसर्गिक वाळू वापरण्याची अट आहे, मात्र, वाळू उपलब्ध होत नाही. कामे पूर्ण होऊनही सुरक्षा रक्कम अजूनही दिलेली नाही, अशा संघटनेच्या मागण्या आहेत. याबाबत संघटनेने बैठक घेतली. त्यात ठेकेदारांनी प्रलंबित देयके न मिळाल्यास काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना संघटनेचे अध्यक्ष मोतीलाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले. या निवदेनावर कार्याध्यक्ष आनंद तोडकरी, सचिव राहुल कौलगे-पाटील यांच्या स्वाक्षरी आहेत.

Jal Jeevan Mission
Pune : कचऱ्याचे ढीग साचल्यानंतर घनकचरा विभागाला आली जाग; रिटेंडर काढून...

आता आत्महत्या हाच पर्याय

जलजीवन मिशनच्या कामांसाठी ठेकेदारांनी व्याजाने रक्कम उभी केली आहे. कामे पूर्ण केली असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाकडून वेळेत देयके मिळत नाहीत. त्यामुळे ठेकेदार आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. याबाबत सतत पाठपुरावा करूनही देयके मिळत नसल्याने सहनशीलता संपली असून, आमच्यासमोर आत्महत्या हाच पर्याय राहिला आहे. त्यामुळे नाईलाजाने जलजीवन मिशनची कामे बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com